
आयपीएलमध्ये एमआयसाठी १०० सामने– सूर्याच्या सुपला शॉट्सचा उत्सव साजरा करूया
वेळ कसा जातो कळत नाही ना, खरंच! 😌
अगदी कालपरवाच तर आपल्या लाडक्या सूर्यादादाने पहिल्यांदाच खास ब्लू अँड गोल्ड परिधान केला होता. आता ४ एप्रिल २०२५ मध्ये पाहूया. तो मुंबई इंडियन्ससाठी १०० वा सामना खेळणार आहे. 🤩 दिवस कसे पालटतात हेच कळत नाही… 🎶
त्याच्या पहिल्या सामन्यापासून ते आपल्या फलंदाजी विभागाचा अविभाज्य घटक होण्यापर्यंत सूर्याने वानखेडे आणि त्याने जिथे जिथे पाऊल टाकले तिथे फटकेबाजी केली आहे. त्याचा सुंदर ड्राइव्ह असो किंवा देखणे षट्कार असोत त्याने हे सर्व केले आहे!
सुप्लानॉमिक्समध्ये पीएचडी केल्यानंतर आपल्या मि. 360° ने प्रत्येक विषयात उत्तम गुण मिळवले आहेत. तणावाखाली खेळणे असो, आपल्या टीमचे नेतृत्व करून क्रिकेटच्या कोषात उपलब्ध असलेले प्रत्येक शॉट जोरदार मारणे असो... सूर्यकुमार यादवने काहीही सोडलेले नाही! 👨🎓
त्याच्या कामगिरीचा परिणाम विसरून चालणार नाही... ३००० पेक्षा जास्त धावा. दोन ट्रॉफी आणि काही अद्वितीय फटके ज्यांनी सामना अक्षरशः घुमवला आहे. स्काय फक्त फलंदाजी करत नाही तर तो शो करतो! 🔥
पलटन, जल्लोष करायचा आहे बरं का. आपला महान खेळाडू, आपला मि. ३६० डिग्री खेळाडूचा गौरव करूया. तो एमआयच्या व्यापक इतिहासात तो आणखी एक प्रकरण लिहायला सज्ज आहे.
…आणि तुम्ही #OneFamily मध्ये असता तेव्हा तुमची कामगिरी म्हणजे टीमची कामगिरी असते, नाही का?! 🫂 हे ठरलेलेच आहे…
आता या मुद्द्यावर सूर्याच्या मित्रमंडळींकडून त्याच्या या खास दिवशी आलेल्या शुभेच्छा पाहा. त्याच्यावर शुभेच्छांची बरसात झाली आहे! 🎥
1️⃣0️⃣0️⃣* matches for MI 😍
— Mumbai Indians (@mipaltan) April 4, 2025
1️⃣ and only सूर्या दादा 🫡#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #LSGvMI pic.twitter.com/exw7EiOefy
सूर्यादादा, तुला नवनवीन कामगिरी करण्यासाठी आणि जादुई क्षणांसाठी खूप खूप शुभेच्छा! 💙