News

२००७ मधला बालपणापासून ते २०२२ पर्यंत दिग्गज होण्याचा रोहित शर्माचा प्रवास

By Mumbai Indians

खूप काही बदलले नाहीये. त्याने डर्बनवर २००७ साली मारलेले षटकार त्याच्या आताच्या खेळाइतकेच दिमाखदार आहेत. खेळ बदलला असेल पण रोहित शर्मा आजही तितकाच धोकादायक आहे आणि त्याचा खेळसुद्धा तसाच तडफदार आहे. तो आता २०२२ मध्येही अगदी पहिल्यासारख्याच राहिलेल्या चार खेळाडूंपैकी एक आहे आणि जास्त महत्त्वाचे म्हणजे तो भारतीय टीमचा कर्णधार आहे. 

तरूण आणि अननुभवी टीममध्ये रोहित सर्वांत तरूण आणि सर्वांत कमी अनुभव असलेला खेळाडू होता. हा प्रकार नवीन होता. खेळ वेगळा होता आणि एमएस धोनीच्या संघाने त्यात सेट होऊन, प्रावीण्य मिळवून पहिला टी२० वर्ल्ड कप भारतात आणेपर्यंत त्याचे निश्चित रूप स्पष्ट नव्हते. 

"मला त्या वर्ल्डकपसाठी निवडण्यात आले तेव्हा मी स्वतःसाठी काहीच अपेक्षा ठेवल्या नव्हत्या," या वर्षीच्या टी२० वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात आलेल्या १५ कर्णधारांसोबत असलेला रोहित म्हणाला. 

"मला फक्त खेळाचा आनंद घ्यायचा होता आणि माझा पहिला वर्ल्ड कप असल्यासारखाच तो खेळायचा होता. आम्ही प्रत्यक्ष वर्ल्ड कप जिंकेपर्यंत वर्ल्ड कप चा भाग असणे म्हणजे काय आणि ही किती मोठी गोष्ट ठरणार आहे हे मला माहीत नव्हते." 

ताण? भीती? श्या. त्याने एका उपांत्य फेरीतल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामना जिंकून देणारे अर्धशतक फटकावले आणि त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध झालेल्या अंतिम फेरीत १६ चेंडूंमध्ये ३० धावा करून आपली इनिंग अत्यंत उत्तमरित्या संपवली. तो आता ३५ वर्षांचा आहे, ऑस्ट्रेलियात आहे, त्याच्या गाठीशी १४० टी२० आंतरराष्ट्रीय सामने आहेत आणि तो पाच वेळा आयपीएलचा विजेता ठरलेला आहे आणि त्याने टी२०आयमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा काढल्या आहेत. खूप गोष्टी खरोखर बदलल्या आहेत. 

"हा एक मोठा प्रवास होता आणि खेळही किती बदलला आहे. २००७ मध्ये सामना खेळला गेला आणि आताचे सामने यांच्यामध्ये किती बदल झाले आहेत हे आपण पाहू शकतो. तेव्हा १४० किंवा १५० ही चांगली धावसंख्या ठरायची आणि आता लोक १४ किंवा १५ ओव्हर्समध्ये इतक्या धावा करायचा प्रयत्न करतात," असे तो म्हणाला. 

"आता टीम्स परिणामांची काळजी न करता जास्त धोके पत्करतात आणि मला वाटते की या स्वरूपात खेळण्याची ही चांगली पद्धत आहे. आमची टीम हेच करायचा प्रयत्न करते आहे. या प्रकारात धोके आहेत पण चांगले परिणामही आहेत. आपल्याला हे धोके पत्करण्यासाठी खूप साहसी असावे लागते आणि परिणामांसाठी तयारही व्हावे लागते." 

त्याला ही भावना माहीत आहे. त्याला हे कसे साध्य करायचे हे माहीत आहे. १५ वर्षे हा मोठा काळ  आहे. त्याने प्रतीक्षा केली आहे. देशाने प्रतीक्षा केली आहे. आता पुन्हा एकदा ती वेळ आली आहे.