News

तिलकचे अर्धशतक आणि सॅम्सच्या चार विकेट सीएसके शेवटच्या चेंडूवर विजयी ठरल्याने पुरेशा ठरल्या नाहीत

By Mumbai Indians

तिलक वर्माने लढवय्या बाण्याने काढलेल्या पन्नास धावा आणि डॅनियल सॅम्सने घेतलेल्या चार विकेट्स पुरेशा ठरल्या नाहीत कारण एमएस धोनीने सीएसकेसाठी १५५ धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर विजय प्राप्त केला.

सीएसकेसाठी रवींद्र जाडेजाने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तरूण खेळाडू मुकेश चौधरी याने पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतल्या. त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन या दोघांनाही बाद केले.

त्यानंतर त्याने आपल्या पहिल्याच खेळात डेवाल्ड ब्रेविसलाही बाद करून तीन विकेट्स पूर्ण केल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी २४ धावांची भागीदारी केली. स्कायने तीन चौकार आणि एक षटकार मारून आक्रमक खेळ केला.

परंतु त्यानंतर स्काय स्लॉग स्वीपचा प्रयत्न करताना चुकला आणि त्यानंतर एमआय आणि टाटा आयपीएलमध्ये पहिला सामना खेळणारा हृतिक शौकीन खेळायला आला. त्याने तिलकसोबत ३८ धावांची भागीदारी केली. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असताना २५ धावांच्या इनिंगमध्ये त्याने तीन चौकार मारले.

कायरन पोलार्ड आणि डॅनियल सॅम्स लवकर बाद झाले. परंतु तिलकने मधल्या काळात पिचचा चांगला अभ्यास केलेला होता. त्यामुळे काही चौकारांच्या मदतीने त्याने वेग पकडला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.

त्यानंतर जयदेव उनादकटकडून एक षटकार आणि चौकार आल्यामुळे आम्ही १५५ धावसंख्या उभी करू शकलो.

त्यानंतर डॅनियल सॅम्सने आम्हाला एक उत्तम सुरूवात करून दिली. त्याने पहिल्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड बाद केले आणि त्यानंतर आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने मिशेल सांतनरला बाद केले.

त्यानंतर रॉबिन उथप्पा आणि अंबाटी रायुदू यांनी ५० धावांची भागीदारी केली. उत्थप्पा प्रथमच सामन्यात उतरलेल्या हृतिक शौकीनच्या हातून कॅच सुटल्यामुळे थोडक्यात बचावला.

त्यानंतर उनादकटने उत्थप्पाला बाद केले आणि त्यानंतर शिवम दुबेला बाद करण्यापूर्वी सॅम्सने दबाव निर्माण केला. सॅम्सने गोलंदाजी करत असलेल्या प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये रायुदूची विकेट काढली आणि सीएसकेला १५ ओव्हरमध्ये १०३/५ या स्थितीत आणून ठेवले. त्यांना त्या वेळी ५३ धावांची गरज होती.

प्रथमच सामना खेळणारा दुसरा खेळाडू रायली मेरेडिथ याने आपल्या तीन ओव्हरमध्ये खूप कमी धावा दिल्या. त्यानंतर त्याने आपल्या कमी वेगाने आलेल्या चेंडूवर विरोधी कर्णधार जाडेजा याला बाद केले.

प्रथमच खेळणारे मेरेडिथ (१/२५) आणि हृतिक शौकीन यांनी चार ओव्हर्समध्ये ०/२३ धावा दिल्या. त्यांची ही कामगिरी खऱ्या अर्थाने चमकदार होती.

बूम आणि उनादकट यांच्या सुंदर ओव्हर्समुळे सीएसकेला अंतिम ओव्हरमध्ये १७ धावा काढाव्या लागणार होत्या.

उनादकटने ड्वायने प्रेटोरियसला आपल्या पहिल्या चेंडूवर लेग बिफोरवर अडकवले. परंतु त्यापूर्वी ड्वायने ब्रावोने एक धाव काढली.

एमएस धोनी ९ चेंडूंवर १२ धावांवर खेळत होता. त्याने त्यानंतर एक षटकार आणि एक चौकार ठोकला आणि पेनल्टी टाइम बॉलवर दोन धावा काढल्या. त्याने अंतिम बॉलवर चार धावा शिल्लक ठेवल्या.

उनादकटने एक लो फुल टॉस टाकला. परंतु धोनी खाली आला आणि त्याने हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर बाऊंड्रीवर टोलवून चौकार लगावला आणि सीएसकेला विजय मिळवून दिला.

रोहितने या अटीतटीच्या सामन्यात गोलंदाजांचे कौतुक केले आणि एमएसडीला त्याच्या शांत वागण्यासाठी श्रेय दिले.

“आम्ही खूप चांगल्या प्रकारे लढलो. आमच्या गोलंदाजांनी आम्हाला चांगली फलंदाजी केली नसतानाही सामन्यात ठेवले. अर्थात एमएसडी किती महान खेळाडू आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याने त्यांना विजय मिळवून दिला,” रोहितने सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितले.

या सामन्याच्या संदर्भात संथ सुरूवात होणे फारसे योग्य नव्हते, असे त्याला वाटले.

“एका गोष्टीकडे बोट दाखवणे कठीण आहे. परंतु आम्ही चांगली सुरूवात करत नाही आहोत. तुम्ही खूप पटापट विकेट्स गमावल्या तर तुम्ही कायमच विजयापासून दूर जाता. आम्ही शेवटच्या ओव्हरपर्यंत त्यांना खूप दबावाखाली ठेवले. पंरतु प्रेटोरियस आणि धोनी यांनी त्यांना विजय मिळवून दिला. आम्ही खूप लवकर खूप विकेट्स गमावल्या आणि फलंदाजीसह चांगल्या प्रकारे परतलो. परंतु हे पुरेसे ठरले नाही,” कर्णधार म्हणाला.

आम्ही आता २४ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर एलएसजीविरूद्ध खेळणार आहोत.