आम्ही आमच्या कौशल्यांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहेः जयदेव उनादकट
जलदगती गोलंदाज जयदेव उनादकटने MI vs CSK सामन्यापूर्वी लाइव्ह पत्रकार परिषदेत उपस्थिती लावली आणि शत्रुत्व, कॅम्पमधील विश्वास आणि एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व यांच्याबाबत चर्चा केली.
टीम प्रत्येक सामना जिंकू किंवा मरू या पद्धतीने खेळण्याचे आव्हान पेलण्याच्या ताणाशी कशा प्रकारे जुळवून घेत आहे याबाबत विचारले असता उनादकटने एक वेगळा दृष्टीकोन मांडला.
“आम्ही गोष्टी सुधारायचा प्रयत्न करत आहोत. आमच्या कामगिरीत नेमके काय चुकते आहे ते पाहून त्यावर काम करायचा प्रयत्न करतोय. एक सामना जिंकणे आवश्यक आहे. काही नेहमीच्या गोष्टी वेगळ्या प्रकारे करण्याची गरज आहे,” जेडीने सांगितले.
“एमआयने वाईट दिवस पाहिले आहेत. आम्ही ट्रॉफीज जिंकल्या आहेत. या सर्वांतून बाहेर येण्यासाठी आपले मन शांत असणे गरजेचे आहे. आम्हा सर्वांना एकाच पानावर असणे आवश्यक आहे. ताण तर नक्कीच असणार. परंतु शांत राहून फील्डवर योग्य ते निर्णय घ्यायला हवेत. ताणामुळे आम्हाला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणे गरजेचे आहे.”
आगामी सामना दोन जुन्या शत्रूंमधला असून तो ब्लॉकबस्टर असेल, उनादकट म्हणाला.
“एमआय आणि सीएसके या दोन सर्वाधिक यशस्वी टीम्स आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या वारशामुळे टाटा आयपीएल खास झाले आहे. तसे बघायला गेले तर हा सामना टाटा आयपीएलचा एल क्लासिको असेल. दोन्ही टीम्स खूप मेहनत करतील आणि हा एक उत्तम सामना असेल,” जेडी उत्साहात म्हणाला.
या गोलंदाजाने टीमच्या डेथ बॉलिंगबद्दलच्या समस्यांवर चर्चा केली आणि एकत्रित कामगिरी करणे खूप महत्त्वाचे असल्याचेही नमूद केले.
“आम्ही योग्य खेळाडूंसाठी योग्य योजना तयार करण्याबाबत चर्चा केली. परंतु त्यांच्यावर अंमलबजावणी हा वेगळा विषय आहे. अचानक मध्येच उत्स्फूर्तपणे स्वतःचे निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे. आम्ही हे मागील दोन सामन्यांमध्ये केले नाही. आम्हाला एकत्रित प्रयत्न करण्याची आणि टीम म्हणून तसेच बॉलिंग युनिट म्हणून उत्तम कामगिरी करण्याची गरज आहे,” असे तो म्हणाला.
“सचिन आणि झॅक सांगतात की आम्ही आमच्या कौशल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि संधी मिळेल तेव्हा हल्ला केला पाहिजे. हे करण्यासाठी आम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. मला या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे की मी सामना विजयी करून देणारी कामगिरी करू शकतो आणि हा स्वतःवरील विश्वास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे,” तो म्हणाला.
उनादकटला कर्णधार रोहित शर्मा आणि कायरन पोलार्डसारख्या वरिष्ठ खेळाडूंना आपला फॉर्म लवकरच गवसेल याबाबत खात्री होती.
“पॉलीचे फलंदाजीचे स्थान आव्हानात्मक आहे. तुम्हाला एकतर तुमचा वेग पुनर्बांधणी करावा लागतो किंवा पुढे सुरू ठेवावा लागतो. काही सामने असे होते जेव्हा एका शॉटने गेम बदलू शकला असता. आम्ही इतक्या जवळ होतो. तुमच्या टीमला ती सीमारेषा एकदा पार करणे गरजेचे आहे. एकदा केले की आपला विश्वास आणि आत्मविश्वास परत येतो. हे सर्वोत्तम खेळाडूंबाबतही घडते आणि एक शॉट सर्व बदलू शकतो. पॉली आणि रोहितला या परिस्थितीतून कसे बाहेर यायचे हे माहीत आहे, याची मला खात्री आहे,” तो शेवटी म्हणाला.
जेडीकडून सर्व प्रश्नांची आत्मविश्वासपूर्ण उत्तरे दिली गेली. आता २१ एप्रिल रोजी डी वाय पाटील स्टेडियमवर टीमला सीएसकेविरूद्ध लढताना पाहायला आम्ही उत्सुक आहोत.