News

WI vs IND पाचवा टी२०आयः आणखी एक तिलक- स्काय स्पेशल, पण दुर्दैव. किंग इज किंग

By Mumbai Indians

कॅलिप्सो किंग्सनी भारताला पाच सामन्यांच्या टी२०आय मालिकेत पराभूत केल्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघांनी आणि प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला.

ब्रँडन किंग (८५*) आणि निकोलस पूरन (४७) यांच्या नेतृत्वाखाली विंडीजच्या संघाने १८ ओव्हर्स आणि ८ विकेट्स राखून १६६ धावांचे लक्ष्य अगदी सहजपणे पार केले. या विजयामुळे यजमान संघाने भारतीय संघाला २०१७ नंतर या मालिकेत प्रथमच हरवले आहे. पहिल्या इनिंगमध्ये १६५ पुढे जाताना भारताला सूर्यकुमार यादवच्या ६१ धावांचा आधार मिळाला. गोलंदाजांनी अटीतटीने प्रयत्न केले पण त्यांच्या मेहनतीला फळ आले नाही.

शेवटच्या सामन्याचा हा सारांश पाहा.

डळमळीत सुरूवातीनंतर तिलकने भारताला पुन्हा पदावर आणले

अकील हुसेनने कालच्या मुक्तपणे धावा करणाऱ्या जोडीला यशस्वी जैस्वाल (५) आणि शुभमन गिल (९) यांना पहिल्या तीनच ओव्हर्समध्ये बाद केल्यानंतर तिलक वर्मा बाहेर आला आणि त्याने टीमला पुढे नेले. आपल्या या लाडक्या खेळाडूने पहिल्या १० चेंडूंमध्ये २० धावा केल्या. त्यात अल्झारी जोसेफच्या चेंडूवर त्याने एक जोरदार षटकार ठोकून त्याला ०-४-६-४-४-१ अशी चांगलीच मजा चाखवली. आपला दादा सूर्यानेदेखील १३ चेंडूंमध्ये १५ धावा करून बॅटला सैल सोडले.

भर पावसाळ्यात स्काय तळपला

तिलक २७ वर बाद झाला. संजू सॅम्सनने (१७) आपली थोडी चुणूक दाखवायचा प्रयत्न केला. त्यामुळे सूर्याला दिशा मिळाली. विंडीजच्या स्पिनर्सनी टाकलेल्या दबावाला बळी न पडता त्याने ३८ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तो रोमारिओ शेफर्डच्या गोलंदाजीवर अंपायरने नाबाद दिल्यामुळे वाचला. परंतु जेसन होल्डरने ६१ धावांवर त्याची इनिंग संपवली.

विंडीजला १६६ धावांचे लक्ष्य

डेथ ओव्हर्समध्ये पाच विकेट्स पडल्या आणि भारताला थोडक्यात धक्का बसला. विंडीजच्या विजयाचे शिल्पकार होते शेफर्ड. त्याने आपल्या करियरमधल्या सर्वोत्तम ४/३१ विकेट्स घेतल्या. त्यांना आता बचाव करायचा होता.

किंग पूरणचा खेळ बहरला

वेस्ट इंडिजच्या धावांचा पाठलागाचा वेग कायली मेयर्स (१०) दुसऱ्या ओव्हरमध्ये बाद झाल्यामुळे मंदावला. पण ब्रँडन किंग आणि निकोलस पूरण यांच्या जोडीने यजमानांसाठी खेळाचा वेग परत आणला. या जोडीमधली ९५ धावांची भागीदारी देखणी होती. त्यांनी जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार आणि षटकार ठोकले. त्यामुळे विंडीजचा संघ १०७/१ वर ११ ओव्हर्समध्ये पावसामुळे खेळ थांबला तेव्हा डीएलएस आवश्यक धावसंख्या (७८) पेक्षा खूप पुढे राहिला.

तिलक छान गोलंदाजी करतो!

अरे! हा नवीन गोलंदाज कोण आहे? हा तर आपला तिलक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच ओव्हरमधल्या दोनच चेंडूंमध्ये त्याने निकोलस पूरनला घरी पाठवले. या विंडीज सुपरस्टारला रिव्हर्स स्वीपचा अंदाज आला नाही. तो हवेत उडाला आणि कर्णधार हार्दिक पंड्याच्या हातात जाऊन विसावला. टीव्ही अंपायरलाच ही विकेट होती याची खात्री देता आली कारण फलंदाजाला आणि मैदानावरील अंपायरना नक्की काय झाले कळलेच नाही.

होपचा षटकार आणि विजय

दुर्दैवाने तिलक वर्माचा हा खेळ थोडा उशिराच बहरला. धावसंख्येचा पाठलाग पूर्ण होत असताना शाई होपने यशस्वी जैस्वालच्या चेंडूवर षटकार ठोकला. एक उसळी मारणारा चेंडू आणि विंडीजच्या फलंदाजाने त्याला जोरात फटकावून टीमला विजय मिळवून दिला आणि त्यांचे मनोधैर्य उंचावणारा मालिकेतील विजयही खिशात टाकला. लक्षात घ्या, विंडीजने या वेळी प्रथमच भारताला अनेक सामन्यांच्या टी२०आय मालिकेत हरवले आहे. अलीकडेच झालेल्या टी२० वर्ल्ड कप पात्रता फेरी आणि ५० ओव्हर वर्ल्ड कप पात्रतेतून ते बाहेर पडल्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कॅरेबियन्सनी आज नक्कीच पार्टी केली असेल.

थोडक्यात धावसंख्या: वेस्ट इंडिज १७१/२ (ब्रँडन किंग ८५*, निकोलस पूरन ४७; तिलक वर्मा १/१७, अर्शदीप सिंग १/२०) कडून भारताचा १६५/९ (सूर्यकुमार यादव ६१, तिलक वर्मा २७; रोमारिओ शेफर्ड ४/३१, अकील हुसैन २/२४) आठ विकेट्सनी पराभव.