
INDvENG, तिसरा ओडीआय: व्हाइटवॉश पूर्ण... सीटी२५ आम्ही आलो!
३-० व्हाइटवॉश = अमदावादमध्ये मज्जा आली ना! 🕺💃
अप्रतिम फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे भारताला तिसऱ्या ओडीआयमध्ये इंग्लंडवर १४२ धावांनी विजय मिळवणे आणि नेत्रदीपक विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये प्रवेश करणे शक्य झाले.
दुसऱ्या इनिंगमध्ये दोन्ही टीम्सनी चांगली कामगिरी केली. परंतु यजमान संघाने कामगिरीचा दर्जा उंचावून मधल्या ओव्हर्समध्ये सामना आपल्या हातात आणला.
मालिकेच्या शेवटच्या सामन्यातील कामगिरी पाहूया… 🤓
गिलचा दमदार खेळ!
शुभमन गिलचा पर्पल पॅच अहमदाबादमध्ये आणखी एका दमदार खेळासोबत कायम राहिला. त्याने १०२ चेंडूंमध्ये १४ चौकार व तीन षट्कारांसह ११२ धावा केल्या.
सलग दोनदा अर्धशतके फटकावल्यानंतर हा २५ वर्षीय खेळाडू आणखी एक पाऊल पुढे गेला. त्याने आपल्या भात्यातल्या तूफानी शॉट्सचे दर्शन सर्वांना घडवले.
शुभ-run in Ahmedabad continues.... 💯#INDvENG #MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/HqgZWxfv9Z
— Mumbai Indians (@mipaltan) February 12, 2025
या दरम्यान या उजव्या हाताच्या फलंदाजाने ओडीआयमध्ये सर्वाधिक वेगवान २५०० धावा केल्या. हा टप्पा त्याने फक्त ५० सामन्यांमध्ये गाठला.
त्याने विराट कोहलीच्या मदतीने स्कोअरबोर्ड हलता ठेवला आणि दुसऱ्या विकेटसाठीच्या भागीदारीत ११६ धावा केल्या.
कोहलीचा दणका!
आपल्या खास कव्हर ड्राइव्ह्ससोबत त्याने ५५ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या आणि चाहत्यांना खूश करून टाकले.
Some 🤌 cover drives on show in Ahmedabad today ✅
— Mumbai Indians (@mipaltan) February 12, 2025
A well-made 5️⃣2️⃣, Virat 👏#INDvENG #MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/7YCTgybGhs
या सामन्यात तो फक्त चौकार आणि षट्कारांचीच भाषा बोलत होता. ओडीआयमध्ये ७३ वे अर्धशतकही या वेळी पूर्ण केले.
अय्यर पुन्हा चमकला!
श्रेयस अय्यरला तर या सगळ्यांची आता सवय झाली असेल, नाही का?! 😉
पहिल्या ओडीआयमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर या मधल्या फळीतल्या फलंदाजाला विराट कोहलीला झालेल्या दुखापतीमुळे आपल्याला खेळण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. त्याने या संधीचे सोने केले हे सांगणे नलगे!
तो १९ ओव्हर्समध्ये आपण १२२/२ वर असताना खेळायला आला. त्याने अजिबात बचावात्मक पवित्रा घेतला नाही आणि आपला नैसर्गिक खेळ खेळताना १२१.८८ च्या स्ट्राइक रेटने ६४ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या.
3️⃣ ODIs. 1️⃣ 🔥 𝗦𝗛𝗥𝗘𝗬𝗔𝗦 𝗜𝗬𝗘𝗥. 🇮🇳#INDvENG #MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/d0zViavSQq
— Mumbai Indians (@mipaltan) February 12, 2025
धावफलक ४० ओव्हर्सवर २७५/४ वर होता.
टीम इंडियाचा खेळ ३५६/१० वर थांबला
केएल राहुलच्या २९ चेंडूंमधल्या ४० धावा आणि खालच्या फळीतल्या फलंदाजांकडून आलेले योगदान यामुळे भारतीय क्रिकेट टीमला ४३ व्या ओव्हरमध्ये ३०० धावांचा टप्पा पार करून चांगली धावसंख्या उभारण्यात यश आले.
वर्ल्ड कप २०१९ नंतर भारताची ही २३ वी ३०० + धावसंख्या ठरली. कोणत्याही देशाने केलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे! 💪
इंग्लंडने धावांचा पाठलाग चांगल्या प्रकारे सुरू केला
इंग्लिश सलामी फलंदाज बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांनी समोर प्रचंड धावांचे लक्ष्य असताना चौकार आणि षट्कारांची बरसात सुरू केली.
परंतु, अर्शपाजी आले आणि दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे पॉवर प्लेच्या शेवटी त्यांची धावसंख्या ८४/२ वर आली.
गोलंदाजांनी कमाल केली!
सलामी फलंदाजांची कामगिरी, टॉम बँटनच्या ४१ चेंडूंमध्ये ३८ दावा आणि गुस अटकिन्सनची कामगिरी वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज चमकला नाही. आपल्या गोलंदाजांनी त्यांना संधीच दिली नाही. 👏
इंग्लिश संघ १२६/३ वरून २१४/१० पर्यंत पोहोचला. त्यांना आव्हान पेलण्यात अपयश आले आणि भारतीय संघाने १९ फेब्रुवारी रोजी सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी उत्तम कामगिरी केली.
थोडक्यात धावसंख्या: भारताकडून इंग्लंडचा १४२ धावांनी पराभव. भारत ३५६/१० (शुभमन गिल ११२; आदिल रशीद ४/६४) इंग्लंड २१४/१० (गुस अटकिन्सन ३८; अक्षर पटेल २/२२).