News

‘एमआय एमिरेट्स’ कडून यूएई इंटरनॅशनल लीग टी२०च्या प्रथमावृत्तीसाठी खेळाडूंची घोषणा

By Mumbai Indians

कायरन पोलार्ड, ड्वायने ब्रावो, निकोलस पूरन, ट्रेंट बोल्ट यांचा टीममध्ये समावेश

एमआय एमिरेट्सने आज यूएई इंटरनॅशनल लीग टी२०च्या प्रथमावृत्तीपूर्वी आपल्या टीमची घोषणा केली आहे. हा संघ अबुधाबीत स्थित असेल आणि त्यात विद्यमान आणि माजी एमआय खेळाडू तसेच #वनफॅमिली चा भाग होणारे नवीन खेळाडूही समाविषअट असतील. कायरन पोलार्ड, ड्वायने ब्रावो, निकोलस पूरन आणि ट्रेंट बोल्ट हे प्रथमावृत्तीच्या सत्रात एमआय एमिरेट्सचा भाग होतील आणि एमआयच्या निळ्या व सोनेरी रंगाची शोभा वाढवतील.

रिलायन्स जिओचे अध्यक्ष श्री. आकाश एम. अंबानी म्हणाले की, “आमच्या #वनफॅमिलीच भाग होणाऱ्या आणि एमआय एमिरेट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. आमचे प्रमुख खेळाडू कायरन पोलार्ड एमआय एमिरेट्समध्ये खेळतील याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. त्याचबरोबर ड्वायने ब्रावो, ट्रेंट बोल्ट आणि निकोलस पूरन हेदेखील संघात पुनरामगन करत आहेत. एमआय एमिरेट्सच्या सर्व खेळाडूंचे मनापासून स्वागत. अनुभव आणि नवीन टॅलेंटमधील गुंतवणूक यांच्यात संतुलन राखण्यासाठी एमआयचा संघ ओळखला जातो. त्यामुळे त्यांची क्षमता वापरून एमआयच्या स्टाइलने खेळता येईल. आमच्या चाहत्यांना आमच्याकडून हेच हवे आहे आणि आम्ही याद्वारे एमआयची मूल्ये आणखी रूजवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

खेळाडूंना लीगच्या मार्गदर्शक तत्वांनुसार साइन करण्यात आले आहे आणि यूएईतील स्थानिक खेळाडूंना नजीकच्या भविष्यात संघात आणले जाईल.

अनु क्र.

खेळाडूचे नाव

राष्ट्रीयत्व

1

कायरन पोलार्ड

वेस्ट इंडिज

2

ड्वायने ब्रावो

वेस्ट इंडिज

3

निकोलस पूरन

वेस्ट इंडिज

4

ट्रेंट बोल्ट

न्यूझीलंड

5

आंद्रे फ्लेचर

वेस्ट इंडिज

6

इमरान ताहीर

दक्षिण आफ्रिका

7

समित पटेल

इंग्लंड

8

विल स्मीड

इंग्लंड

9

जॉर्डन थॉम्प्सन

इंग्लंड

10

नजीबुल्ला जद्रान

अफगाणिस्तान

11

झहीर खान

अफगाणिस्तान

12

फझलहक्क फारूकी

अफगाणिस्तान

13

ब्रॅडली व्हील

स्कॉटलंड

14

बास दे लीड

नेदरलँड्स