News

झिम्बाब्वे विरूद्ध भारत तिसरा एकदिवसीय सामनाः भारताकडून रझा नावाच्या वादळाचा सामना आणि ३-० ने मालिका खिशात

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट संघाने सोमवार २२ ऑगस्ट रोजी हरारे येथील तिसऱ्या सामन्यात १३ धावांनी विजय प्राप्त करून झिम्बाब्वेमध्ये एकदिवसीय मालिका व्हाइटवॉश जिंकली.

शुभमन गिल हा ९७ चेंडूंमध्ये १४० धावा करून पहिल्या इनिंगमध्ये सर्वोत्तम फलंदाज ठरला तर सिकंदर रजाच्या ९५ चेंडूंमधील ११५ धावांमुळे २०१३ नंतर प्रथमच भारतावर एकदिवसीय सामन्यातील विजयाच्या जवळ पोहोचणे झिम्बाब्वेला शक्य झाले.

ब्रॅड इवान्सने या वेळी उत्तम गोलंदाजी केली. त्याने प्रथमच पाच विकेट्स घेतल्या (५/५४).

भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली आणि आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने खेळणाऱ्या ११ च्या संघात दोन बदल केले. दीपक चहर आणि अवेश खान हे खेळाडू मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याऐवजी खेळवण्यात आले.

दरम्यानच्या काळात झिम्बाब्वेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळणाऱ्या ११ च्या संघात दोन बदल केले. रिचर्च गारावा आणि टोनी म्युनोंगा हे खेळाडू तानक चिवांगा आणि वेस्ली माधेवीरे यांच्याऐजी खेळण्यासाठी आले.

भारताची सुरूवात थोडी संथ झाली. त्यांनी पॉवरप्ले ओव्हर्समध्ये ४१ धावा केल्या.

केएल राहुल हा बाद होणारा पहिला खेळाडू ठरला. ब्रॅड इवान्सच्या बॅक ऑफ लेंथ गोलंदाजीने त्याच्या बॅटच्या आतील बाजूला स्पर्श केला आणि स्टंप्स उडवले.

इवान्सच्या चेंडूवर आणखी एकदा बॅटची कडा लागून चेंडू सरळ कव्हरवर उभ्या असलेल्या सीन विल्यम्सकडे गेला. त्यामुळे त्याच्या खात्यात आणखी एक विकेट पडली.

ईशान किशन खेळायला आल्यानंतर भारताचा धावफलक वेगाने हलू लागला. त्याने आणि शुभमन गिल याने तिसऱ्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी करून सामन्याचे भवितव्य निश्चित केले.

किशनने दुसरे एकदिवसीय सामन्यातील अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो ४३ व्या ओव्हरमध्ये बाद झाला.

दीपक हूडा ४६ ओव्हरच्या शेवटी खूप पटकन बाद झाल्यानंतर वैतागलेला दिसत होता. त्यानंतर संजू सॅम्सन सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला.

ल्यूक जोंगवेच्या गोलंदाजीवर एकामागून एक षटकार ठोकल्यानंतर सॅम्सनने एक पूर्ण लांबीचा चेंडू डीप स्क्वेअर लेगकडे ताकुझवानाशे कैतानोकडे उडवला.

शुभमन गिलची तडाखेबाज इनिंग शेवटच्या ओव्हरमध्ये ब्रॅड इवान्सने संपुष्टात आणली. शुभमनचा एक अंदाज चुकला आणि चेंडू सरळ लाँग ऑफवर इनोसंट कैयाच्या हातात जाऊन विसावला.

इवान्सने शार्दुल ठाकूरचा बळी घेऊन एकूण पाच विकेट आपल्या खिशात टाकल्या.

झिम्बाब्वेच्या समोर २९० धावांचे लक्ष्य होते. त्यांची पहिली विकेट तिसऱ्या ओव्हरमध्ये गेली. भारताने एलबीडब्ल्यूसाठी आवाहन केले आणि दीपक चहरच्या खिशात इनोसंट कैयाची विकेट आली.

सहाव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर एक जोरदार षटकार ठोकल्यानंतर डाव्या पायात वेदना झाल्यामुळे १२ धावा करून बाहेर पडला.

सीन विल्यम्स आणि टोनी मुन्योंगा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे झिम्बाब्वेने ११ व्या ओव्हरमध्ये ५० धावा पूर्ण केल्या.

झिम्बाब्वेचे दोन्ही फलंदाज १७ व्या आणि १८ व्या ओव्हरमध्ये बाद झाले. त्यामुळे आत्मविश्वासाने फलंदाजी करणाऱ्या यजमान संघावर थोडा दबाव वाढला.

सिकंदर रझा आल्यानंतर त्याने यजमान संघाला भारतीय संघाविरूद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावसंख्येच्या जवळपास नेले.

ब्रॅड इवान्ससोबत नवव्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केल्यामुळे झिम्बाब्वेला १२ चेंडूंमध्ये फक्त १७ धावांची गरज उरली.

परंतु ४९ व्या ओव्हरमध्ये त्याची ९५ चेंडूंमध्ये ११५ धावांची तडाखेबाज खेळी संपली आणि झिम्बाब्वेने पुढील पाच चेंडूंमध्ये आपल्या शेवटच्या दोन विकेट्स गमावल्या.

अपयशाच्या दाढेतून सामना खेचून आणत भारताने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात १३ धावांनी विजय मिळवला आहे. त्यांनी झिम्बाब्वेविरूद्ध ३-० सामन्यांचा व्हाइटवॉश विजय प्राप्त केला. त्यामुळे भारताने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलग १५ सामने झिम्बाब्वेविरूद्ध जिंकले आहेत.