News

#आलीरे MIvDC पूर्वावलोकन: २०२३ च्या डब्ल्यूपीएल फायनल प्रीव्ह्यूची आठवण. निकालसुद्धा तोच हवाय!

By Mumbai Indians

चला वेळ आलीय. २०२३ या वर्षात इतिहास रचला गेलाय आणि विमेन्स क्रिकेटचा चेहरामोहरादेखील बदललाय. पण आता २०२४ मध्ये त्याला नियमित रूप देण्याची वेळ आली आहे. हो, डब्ल्यूपीएल सुरू होतेय. हो, मुंबई इंडियन्स सध्या चॅम्पियन्स आहेत. होय, विमेन्स क्रिकेट लीग नियमित होणार आहे. बरोबर, आपण एक वर्ष वाट पाहिलीय पलटन. चला तर मग सुरूवात करूया.

आपली कप्तान कौर, अष्टपैलू त्रिदेवी अमेरिया केर, हायली मॅथ्यूज आणि नॅट स्किव्हर-ब्रंट, इसी वाँग आणि साईका ईशाक या २०२३ च्या तरूण छुप्या रूस्तम, कोच शार्लट एडवर्ड्स, गुरू झुलन गोस्वामी आणि संपूर्ण एमआय टीम आता तयार आहे. यातली प्रत्येक खेळाडू एक मोठी आणि चांगली खेळाडू होऊन परतलीय. आपण मागच्या वर्षी ब्रेबॉर्न स्टेडियमवर जिथे थांबलो होतो त्याच खास संध्येला सुरूवात करतोय. तेसुद्धा डब्ल्यूपीएल २०२३ अंतिम सामन्याची पुनरावृत्ती करून.
आम्हाला माहित्ये की कॅपिटल्सना बदला हवाय. पण आम्हीसुद्धा तयार आहोत. थोडक्यात सांगायचे तर क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी आणि मग शेवटी आपल्या मुली चिन्नास्वामीला ब्लू अँड गोल्डमध्ये रंगवायला तयार असतील!

काय: मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स

कधी: २३ फेब्रुवारी २०२४ | रात्री ८.०० वाजता.

कुठे: चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू.

काय अपेक्षा आहे: मागच्या वर्षी एमआयच्या फलंदाजांनी पहिल्या डब्ल्यूपीएल सामन्यात काय धुमाकूळ घातला होता आठवतो ना? तुम्हाला त्याची आठवण करून देऊया. हायली: ४७ (३१), हरमन: ६५(३०), अमेलिया: ४५(२४), पूजा: १५(८), ईसी: ६(१), एमआय: २०७/५ (२० ओव्हर्स). होय. असेच काहीतरी होण्याची अपेक्षा आहे पलटन. चला ती जर्सी घाला. तुमचे मंत्र म्हणायला तयार राहा. … गणपती बाप्पा मोरया!!!

ते काय म्हणतात: "ती एक खूप चांगली खेळाडू आहे आणि जिथे कुठे खेळली तिथे आपल्या देशासाठी आणि लीगसाठी तिने बरेच काही केले आहे. तिचा गोलंदाजीचा वेग चांगला आहे. वाँगीने (ईसी वाँग) मागच्या वर्षी टीम चांगली संतुलित केली होती. आम्हाला या वर्षीदेखील एकामागून एक सामने खेळायचे आहेत आणि प्रवासही करायचा आहे. त्यामुळे ती आम्हाला जास्त कुशनिंग देते आणि टीम संतुलित करते. तिला संधी मिळेल तेव्हा ती टीमसाठीदेखील उत्तम खेळेल अशी आशा आहे." – आपली जलदगती खेळाडू शबनीम ईस्माईलबाबत हरमनप्रीत कौर म्हणाली.