एएम गझनफर – जादुई खेळाडू!
#BatchOf2025 अगदी उत्तम आणि योग्य प्रकारे तयार झाली आहे आणि भारतीय क्रिकेट महोत्सवाच्या आगामी सीझनमध्ये आपली छाप सोडण्यासाठी सज्ज आहे.
अनुभवी खेळाडू आणि भविष्यातले स्टार्स यांनी आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनमध्ये #OneFamily मध्ये प्रवेश मिळाला आहे.
२०२४ हे वर्ष संपत असताना आपण आणखी अशाच एका भविष्यातील स्टारबद्दल बोलणार आहोत ज्याने देशांतर्गत क्रिकेटपासून जागतिक क्रिकेटमध्ये एंट्री करताना निवड समितीवर आपल्या सुंदर खेळाद्वारे प्रभाव टाकला.
**********
खात्रीलायक खेळाडू ते सीझन्ड खेळाडूपर्यंतचा प्रवास
गझनफर भाऊने अफगाणिस्तानमधील टी२० स्पर्धा असलेल्या श्पगीझा क्रिकेट लीग २०२२ द्वारे व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरूवात केली.
त्याने मिस ऐनाक नाइट्ससाठी तीन सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतलेल्या या नवीन खेळाडूबद्दल लोकांना फारसे माहीत नव्हते. त्याच्या दुसऱ्याच सामन्यात त्याने हिंदुकुश स्टार्सविरूद्ध दणदणीत ४/१५ ची कामगिरी केली.
त्याची आंतरराष्ट्रीय पटलावर आगमनाची चिन्हे? अर्थातच.
मग आले २०२४. या उजव्या हाताच्या स्पिनरने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा ठसा उमटवायला सुरूवात केली होती.
तीन देशांच्या अंडर १९ टूर्नामेंट २०२३-२४ मध्ये भारत, अफगाणिस्तान आणि त्यांची दक्षिण आफ्रिका या टीम्स खेळत होत्या. त्यात गझनफरने आपला माजी स्टार क्वेना माफकासोबत चार इनिंग्समध्ये १० विकेट्ससह संयुक्तरित्या सर्वोत्तम विकेट्स घेणारा खेळाडू म्हणून स्थान पटकावले.
या मिस्टरी स्पिनरला त्यामुळे अंडर १९ टी२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये अफगाणिस्तानच्या संघात जागा मिळाली. त्याने पुन्हा एकदा या सामन्यात आपला पाय पॅडलवरून काढलाच नाही.
त्याचा संघ पिछाडीवर असताना ३.३५ च्या सरासरीने चार सामन्यांमध्ये त्याने आठ विकेट्स घेतल्या. त्यांच्या पिछाडीच्या निराशेला ही आशेची झालर ठरली.
…आणि मग आला आंतरराष्ट्रीय सामन्याचा कॉल!
मार्च २०२४ मध्ये झालेल्या अफगाणिस्तान विरूद्ध आयर्लंड या एक दिवसीय मालिकेत गझनफरची जादू चांगलीच चालली.
टी२० विश्वचषक २०२४ नंतर या किशोरवयीन सेन्सेशनची निवड शारजा, यूएईमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी झाली. गझनफरने सुरूवातीच्या सामन्यात १० ओव्हर्समध्ये अद्वितीय ३/२० ची कामगिरी केली. त्यामुळे अफगाणिस्तानला प्रोटीआजविरूद्ध सर्व स्वरूपांमध्ये पहिलावहिला सहा विकेट्सनी विजय मिळवणे शक्य झाले.
त्यानंतर बांग्लादेश ओडीआयचा पहिला सामना झाला. त्यात गझनफरने आपल्या पहिल्या पाच विकेट्स ६/२६ घेतल्या. या सामन्यात अफगाणिस्तानने ९२ धावांनी विजय प्राप्त केला. याशिवाय ओडीआयमध्ये पाच विकेट्स घेणारा तो पाचवा सर्वांत तरूण खेळाडू ठरलाय. मानलं रे!
𝐖𝐈𝐍𝐍𝐈𝐍𝐆 𝐌𝐎𝐌𝐄𝐍𝐓𝐒! 🎉
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
AMG Shines and AfghanAtalan register a terrific victory in the 1st match of the ODI series against @BCBtigers!
Enjoy the winning moments here! 👏#AfghanAtalan | #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/TvpJQ6AafQ
अरे थांबा जरा. गझनफर भावाने आणखी एका पाच विकेट्सच्या कामगिरीसह उत्साहात भर घातली. या वेळी त्याने डिसेंबर २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध ही कामगिरी केली. त्याचा नेत्रदीपक खेळ इथे पाहता येईल …
Ghazanfar gets another 5-fer!🪄
— FanCode (@FanCode) December 21, 2024
The spin sensation made light work of Zimbabwe's batting line-up to bag his 2nd 5-wicket haul in ODIs in only his 11th ODI. #ZIMvAFGonFanCode pic.twitter.com/7p4K4LbKYm
त्याच्यासाठी २०२४ हे वर्ष आणखी चांगले ठरले, कारण!
आपल्या १८ वर्षीय उगवत्या खेळाडूला ख्रिसमसची यापेक्षा चांगली भेट मिळू शकली नसती. संपूर्ण वर्षभरात त्याने केलेल्या अप्रतिम खेळामुळे त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची पहिलीच संधी मिळाली.
Woh 𝙢𝙖𝙞𝙙𝙚𝙣 𝙏𝙚𝙨𝙩 𝙘𝙖𝙡𝙡-𝙪𝙥 waali feeling 🥹
— Mumbai Indians (@mipaltan) December 25, 2024
Congratulations, Ghazanfar 💙#ZIMvAFG #MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/enAJazSoLt
अभिनंदन, एएम गझनफर! पलटन खेळाच्या सर्वांत शुद्ध स्वरूपात तुला यश मिळो यासाठी प्रार्थना करतेय! 💙
**********
आपल्यासाठी उत्साहाचा काळ!
हा आपला तरूण खेळाडू हळूहळू आणि सातत्याने स्वतःसाठी नाव कमवतो आहे.
आयपीएल २०२५ फक्त काहीच महिन्यांवर आली आहे. त्यामुळे गझनफरच्या जादूसाठी तयार राहा. तो आधुनिक युगाच्या टी२० क्रिकेट फॉर्म्युलात उत्तमरित्या फिट होतो.