News

व्हीएचटी २०२४-२५ मध्ये MI: तिलक वर्माचा जोरदार फॉर्म आणि बरेच काही!

By Mumbai Indians

विजय हजारे ट्रॉफी २०२५ पूर्ण स्विंगमध्ये आहे आणि आपले ब्लू अँड गोल्डमधले स्टार्स खेळतायत आणि आपापल्या टीम्ससाठी ट्रॉफी उचलण्यासाठी उत्सुक आहेत.

तुम्ही तयार आहात का? चला सुरूवात करूया!

सामन्याचा दिवस ३ | २६ डिसेंबर तिलक वर्मा, दीपक चहरची चमकदार कामगिरी

सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर हैदराबादचा कर्णधार तिलक वर्मा ५७ धावा करून स्टाइलमध्ये परतलाय. त्याच्या संघाला सौराष्ट्राविरूद्ध पराभव पत्करावा लागला. परंतु, या अर्धशतकामुळे स्पर्धेत पुढे जाताना त्याचा उत्साह नक्कीच चांगला राहील.

दुसरीकडे दीपक चहर आणि अर्जुन तेंडुलकरच्या अष्टपैलू खेळामुळे त्यांच्या टीमच्या विजयात मोलाचे योगदान दिले गेले.

चहरच्या २/५१ आणि २१ चेंडूंमधील २६ धावांमुळे राजस्थानला हिमाचल प्रदेशवर दोन विकेट्सनी विजय मिळवता आला. त्याचवेळी तेंडुलकरच्या १/४० आणि २४ चेंडूंमधील २६ धावांमुळे गोव्याला मणिपूरवर १७१ धावांनी सहजपणे विजय मिळवता आला.

आंध्र प्रदेशच्या सत्यनारायण राजूनेही आपला विकेट घेण्याचा वेग कायम ठेवला. त्याने सिक्कीमवर दणदणीत आठ विकेट्सनी विजय नोंदवताना आणखी तीन विकेट्स घेतल्या.

सामन्याचा दिवस ४| २८ डिसेंबर थोडा निराशेचा दिवस, पण खेळ सुरू राहिलाच पाहिजे

एमआयच्या स्टार्सनी आपापल्या टीम्ससाठी उत्तम खेळ केला. परंतु त्यांची कामगिरी त्यांच्या दर्जापेक्षा थोडी कमी पडली.

बडोद्याचा हार्दिक पांड्या स्पर्धेत आपला पहिलाच सामना खेळला. त्याने बंगालविरूद्ध सात ओव्हर्समध्ये ३३ धावा देऊन एक विकेट घेतली.

उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज सत्यनारायण राजू याने विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ ची सातवी विकेट घेतली. त्याच्या ८-०-३०-१ च्या कामगिरीमुळे आंध्र प्रदेशच्या संघाने सर्व्हिसेसच्या संघावर १० धावांनी विजय मिळवला.