News

AUSvIND, चौथा कसोटी सामना: नितिशचे क्लासी शतक, बूमचा रेकॉर्ड आणि दुःख

By Mumbai Indians

वर्षाचा हा एक असा काळ आहे जिथे चाहते आणि खेळाडू सणांच्या मूडमध्ये आहेत आणि बॉक्सिंग डे कसोटी सामन्यानंतर त्यात भरच पडली आहे! 🎄

पॉपकॉर्नचे क्षण खूप आले- कोहली आणि कोन्टास समोरमासमोर, स्मिथचा नाट्यमय खेळ, सिराजचा धोरणात्मक खेळ, रोचा वायबीजेवरचा गल्ली क्रिकेट रिमार्क- आणि नितीश कुमार रेड्डीने या वेळी पहिले आंतरराष्ट्रीय शतक केले. त्यामुळे चाहत्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

द जीवर पाच दिवसांचा हा सामना अशा प्रकारे पार पडला!

दिवस पहिला | ऑसीजची धमाल, बूमच्या तीन विकेट्स

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या होम टीमने मधल्या फळीत खूप धमाल केली. त्यांच्या पहिल्या क्रमांकाच्या चारही फलंदाजांनी अर्धशतके झळकवली.

कसोटीतला सर्वांत तरूण ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाज असलेल्या सॅम कोन्स्टास फक्त १९ वर्षे ८५ दिवसांचा आहे. त्याने आपल्या ० धावांच्या संपूर्ण मनोरंजक खेळादरम्यान काही अप्रतिम शॉट्स मारले. परंतु विराट कोहलीने त्याला पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला.

धावफलक चांगलाच धावत होता. पण बूमने अगदी वेळेत विकेट्स घेतल्या. त्याने टीम इंडियासाठी धोकादायक असलेल्या ट्राविस हेडला सात चेंडूंमध्ये शून्यावर बाद केले. 😎

संध्याकाळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३११/६ वर होती. स्टीव्ह स्मिथ ६८ वर नाबाद होता आणि शतकाकडे वेगाने चालला होता.

दिवस दुसरा | जैस्वाल - कोहलीची महत्त्वाची भागीदारी

दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन इनिंग्स ४७४/१० वर संपल्या. स्टीव्ह समिथने तब्बल १४० धावा केल्या आणि कसोटीमध्ये ४३ इनिंग्समध्ये ११ वे शतक फटकावले. ही कोणत्याही खेळाडूने केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली.

दरम्यान धावांची तफावत दूर करण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी खेळाचे नियंत्रण घेतले. त्यांनी १०२ धावांची भागीदारी दणक्यात केली. जैस्वालने ८२ धावांचे योगदान दिले तर कोहलीने ३६ धावा केल्या. परंतु त्यानंतर थोडी गडबड झाली आणि जैस्वाल बाद झाला.

परंतु, ऑसीजनी दिवसाच्या शेवटी खेळावर नियंत्रण प्राप्त केले. पाहुण्या संघाने एकामागून एक विकेट्स गमावल्या. आपला संघ १५३/३ वरून १५९/५ पर्यंत पोहोचला. आपल्यासाठी दिवसाचा शेवट फारसा चांगला नव्हता पण दुसऱ्या दिवशी काय झाले याची कल्पना खचाखच भरलेल्या एमसीजी ग्राऊंडवरच्या कोणालाही नव्हती.

दिवस तिसरा | नितीश रेड्डीचा वणवा आणि धमाल

हा दिवस नितीश कुमार रेड्डी आणि त्यांचे कुटुंबीय कधीच विसरणार नाहीत.

कसोटीच्या पांढऱ्या कपड्यांमधली आपली पहिली मालिका खेळताना या २१ वर्षीय खेळाडूने बीजीटी २०२४-२५ मध्ये स्वतःला सातत्यपूर्ण फलंदाज म्हणून स्थापित केले आहे आणि या वेळी तो इथे कायम का टिकणार हे त्याने सिद्ध केले आहे!

भारतीय संघ १९१/६ वर असताना तो ८ व्या क्रमांकावर आला. फॉलोऑनची भीती आपल्या डोक्यावर होती. मग रेड्डीने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि या दिवसाच्या शेवटी आपल्या नाबाद १०५ धावांची परिपक्व खेळी केली. त्याने विशेषतः ९० धावांच्या आसपास असताना प्रचंड संयम दाखवला.

या प्रक्रियेत त्याने अनेक विक्रम नोंदवले. ऑस्ट्रेलियात ८ व्या किंवा त्या खालील क्रमांकाच्या भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रमही त्याने केला.

आपण वॉशिंग्टन सुंदरचा शांत आणि संयमी खेळही विसरू शकत नाही. त्याने दुसऱ्या बाजूने अप्रतिम सहाय्यक खेळ केला आणि अर्धशतक फटकावले.

रेड्डी- सुंदर यांचे सर्वांकडूनच कौतुक झाले. मास्टर ब्लास्टरनेही या तरूण जोडीने दाखवलेल्या कटिबद्धता आणि विश्वासाचे खूप कौतुक केले.

दिवस चौथा | डीएसपी सिराज, जस्सीची मज्जा; ऑसीजचा लढाऊ बाणा

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील टीमने दिवसाची सुरूवात करताना पहिल्या पाच ओव्हर्समध्येच भारतीय संघाला ३६९ वर सर्व बाद केले आणि १०५ धावांची आघाडी घेतली.

नंतर टीम इंडियाने सगळी जबाबदारी घेतली आणि बूम-सिराजच्या जोडीने बॅगी ग्रीन्सला ९१/६ वर प्रतिबंध केला. या प्रक्रियेत जसप्रीत बुमराने १९.५६ च्या अप्रतिम सरासरीने २०० कसोटी विकेट्स घेतल्या. किमान २०० विकेट्ससोबत या स्वरूपात क्रिकेटपटूंच्या इतिहासात त्याने ही सर्वोत्तम कामगिरी केली.

त्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमने प्रतिकार सुरू केला. त्यांच्या शेवटच्या फळीतल्या फलंदाजांनी सुमारे ४० ओव्हर्स खेळल्या आणि भारतीय संघाला थोडा झटका दिला. त्यांनी महत्त्वाच्या धावाही जोडल्या.

त्यांनी स्टंप्सवर आघाडी ९१/६ पासून २२८/९ वर नेली. परिस्थिती गंभीर होती परंतु या पाचव्या दिवशी दोन्ही संघांना निर्णय काहीही लागू शकतो याचा अंदाज होता.

दिवस ५ असे होणे शक्य नव्हते

आणखी एका पाच विकेट्सच्या कामगिरीमुळे देशाच्या खजिन्यात मोलाची भर पडली! 💪

बुमराने शेवटच्या दिवशी पहिल्याच ओव्हरमध्ये नॅथन लिऑनला बाद केले आणि भागीदारी मोडीत काढली. भारतीय क्रिकेट टीमसमोर ३४० धावांचे लक्ष्य ठेवले होते.

यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत या दोघांनी संघ ३३/३ ने पिछाडीवर असताना कमान हातात घेतली आणि त्यांनी केलेल्या ८८ धावांच्या भागीददारीमुळे भारतीय संघाला आशेचा किरण दिसला. परंतु, पंतच्या विकेटमुळे डाव पत्त्यांच्या डावासारखा कोसळला आणि १२१/४ वरून धावसंख्या पुढच्या २० ओव्हर्समध्ये सर्वबाद १५५ पर्यंत पोहोचली.

यजमान संघाच्या पारड्यात २-२ ने सामने आले आहेत. याचाच अर्थ असा की टीम इंडियाला बीजीटी २०२४-२५ मध्ये ३ जानेवारी २०२५ रोजी सुरू होणाऱ्या सिडनीतील सामन्यात बरोबरी करण्याची अपेक्षा असेल.

थोडक्यात धावसंख्या: ऑस्ट्रेलिया ४७४/१० (स्टीव्ह स्मिथ १४०, जसप्रीत बुमरा ४/९९) आणि २३४/१० (मार्नस लाबुसचेंग ७०, जसप्रीत बुमरा ५/५७) कडून भारताचा १८४ धावांनी पराभव ३६९/१० (नितीश रेड्डी ११४, स्कॉट बोलंड ३/५७) आणि १५५/१० (यशस्वी जैस्वाल ८४, पॅट कमिन्स ३/२८).