News

एक टीम म्हणून आम्ही हार्दिकसोबत होतो. आम्ही विरूद्ध जग अशी स्थिती होती: बुमरा

By Mumbai Indians

आयपीएलमध्ये आपल्या आगळ्यावेगळ्या एक्शनसाठी लोकांच्या नजरा वेधून घेणारा खेळाडू ते विजयी टी२० विश्वचषक २०२४ मोहिमेत भारतासाठी मालिकापटू ठरलेला खेळाडू जसप्रीत बुमराचा क्रिकेटचा प्रवास अद्भुत असाच म्हणावा लागेल.

पण मुंबई इंडियन्सच्या या जलदगती खेळाडूकडे एक गोष्ट मात्र सातत्याने आहे. ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास. बुमरा कायमच आपल्याला काय हवेय त्याबाबत स्पष्ट होता. त्याने प्रचंड मेहनत केली आणि लंबी रेस का घोडा म्हणून स्वतःला सिद्ध केले.

“मी खेळायला सुरूवात केली तेव्हाही माझ्या मनात कायम हा विचार असायचा की मी खूप चांगला आहे. कारण मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर कोण ठेवेल? मला टीममध्ये येण्यासाठी खूप झटावे लागले नाही. पण लहानपणी मला फॉर्मल क्रिकेट खेळण्याच्या खूप संधी मिळाल्या नाहीत. मी कायमच माझ्या कामावर विश्वास ठेवला आहे,” बूम बूमने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

बूम बूम हे प्रत्येक कर्णधाराचे स्वप्न असते. त्याचे रोहित शर्मासोबतचे नाते स्वर्गात बांधलेल्या गाठीसारखे होते. एमआय पलटनला त्या दोघांचाही खूप अभिमान वाटतो. रोहित- बुमरा ही जोडी आपल्या पाच आयपीएल चषकांसाठी आघाडीवर होती. या एमआयच्या निष्ठावंतांनी आपले स्वप्न या टीमच्या माध्यमातून जगले आहे.

हिटमॅनला जेव्हा जेव्हा काहीतरी मदत हवी असते त्याला दुसऱ्या कोणाकडे जायची गरज पडत नाही कारण बुमरा कायम सोबत असतो. अलीकडेच झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्येही रोहितसाठी कठीण परिस्थितीत बुमराने टीमसाठी पुढे येऊन उत्तम कामगिरी केली आहे. पॉवरप्ले, मधल्या ओव्हर्स, नवीन चेंडू किंवा जुना चेंडू. बूम बूमसाठी काहीही कठीण नाही. कारण त्याने खूप स्टाइलमध्ये डिलिव्हरी केलीय. 

“मला रोहितसोबत बऱ्याच काळापासून खेळताना खूप कृतज्ञता वाटते. त्याच्यासोबत खेळताना खूप मजा आली. मी आयपीएलमध्ये खेळायला सुरूवात केली तेव्हा जाऊन रोहितला सांगायचो की मी या वेळी खेळणार आहे. तू क्षेत्ररक्षण ठरव. तुला योग्य वाटेल तेव्हा मला सांग. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने मला खेळाडू म्हणून उदयाला येताना पाहिले आहे,” बुमराने आपल्या सीनियर प्रोचे कौतुक करताना सांगितले.

बूम बूमने हिटमॅनच्या कर्णधार म्हणून कारकीर्दीचेही कौतुक केले. त्याने आपल्या मनापासून प्रेम आणि आदराने या कारकीर्दीचा उल्लेख केला.

“रोहितला गोलंदाजांबाबत खूप सहानुभूती आहे. तो खेळाडूंच्या भावना समजून घेतो. तो खेळाडूची परिस्थिती समजून घेतो. तो प्रत्येकाचे ऐकून घेतो आणि आपल्यासाठी काय योग्य आहे त्याचा निर्णय घेतो. खेळाडूंना कसे सांभाळायचे आणि प्रत्येक खेळाडूला स्वातंत्र्याने खेळता येण्यासाठी कम्फर्टेबल कसे वाटेल याची काळजी घेतो,” बुमरा म्हणाला.

बुमरा गोलंदाजीत अक्षरशः आग ओकते. पण त्याचे कोवळे हृदय टीमसाठी धडकते. तो कोणत्याही टीममेटला कठीण परिस्थितीत एकटे सोडत नाही.

आयपीएलचा सीझन कठीण झालेला असताना आपला नवीन कर्णधार हार्दिक पांड्यालाही बूम बूमने पटकन मदत केली होती.

आपला देश भावनांवर चालतो. चाहते खूप भावनिक होतात. खेळाडूही भावनिक होतात. कधीकधी तुमचे स्वतःचे चाहते तुमच्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. हे असेच आहे आणि तुम्हाला या सगळ्यातून मार्ग काढावा लागतो. कारण उत्तम खेळ करूनच आपण लोकांचे तोंड बंद करू शकतो.”

“लोक ओरडत असतात. पण आपले आतले वर्तुळ आपल्याला मदत करते. एक टीम म्हणून आम्ही त्याला प्रोत्साहन देत नाही किंवा पाठीशीही घालत नाही. आम्ही त्याच्याशी बोलत होतो. त्याला मदत हवी असेल तेव्हा त्याचं हे कुटुंब त्याच्यासोबत कायम असेल.”

“एक टीम म्हणून आम्ही कोणालाही मागे सोडू शकत नाही. आम्ही कायम एकमेकांसाठी एकमेकांना मदत करायला सज्ज असतो. आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही विरूद्ध जग असेच कायम असते,” टीममधल्या प्रत्येक खेळाडूने आपल्या नवीन कर्णधाराला कठीण परिस्थितीत कशा प्रकारे पाठबळ दिले हे बुमराने सांगितले.

बूम बूमने मुंबई इंडियन्ससाठी २०१३ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीची विकेट घेतली. तो मागच्या १२ वर्षांपासून आपला महत्त्वाचा शिलेदार आहे आणि पलटन कुटुंबाचा महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. गंमत म्हणजे या जलदगती खेळाडूला एमआयसोबत इतर कोणत्याही टीमसोबत आयपीएल करियर करता येईल का अशी शंका आहे.

“माहीत नाही. मी त्याचा विचार केलेला नाहीये. मी खेळलेल्या पहिल्या सामन्यापासून फक्त मुंबई इंडियन्सचाच विचार केला आहे. आता याला १० वर्षांपेक्षा जास्त काळ गेलाय.”

बूम बूम ब्लू अँड गोल्ड जर्सी परिधान करून आपल्या भेदक वेगाने, घातक यॉर्कर्सनी आणि विविध प्रकारच्या गोलंदाजीने इतर अनेक फलंदाजांचा धुव्वा उडवेल, याची पलटनला खात्री आहे. बूम बूम-एमआय स्टोरी बॉक्स ऑफिस हिट आहे.