News

बी बुमरा x 400 – बूम बूमच्या नावावर 400 आंतरराष्ट्रीय विकेट्स!

By Mumbai Indians

आणखी एक दिवस, आणखी एक उत्तुंग कामगिरी. जसप्रीत बुमरा सध्या खतरनाक गोलंदाज बनलाय. बूम बूमने चेन्नईमध्ये शुक्रवारी (२० सप्टेंबर) बांग्लादेशविरूद्ध पहिला कसोटी सामना खेळताना फक्त 196 व्या सामन्यात 400 विकेट्सचा टप्पा गाठलाय.

त्याच्या करियरचा आलेख प्रचंड सुंदर आहे! त्याने असंख्य वेळा स्टंप्स उडवलेत आणि चाहत्यांचेही मनोरंजन केले आहे. अपारंपरिक एक्शनसह गोलंदाज आपल्या कौशल्यासह क्रिकेटचे जग जिंकण्यासाठी तयार आहे. 400 विकेट्स आणि पुढे…

या निमित्ताने बूम बूमच्या महत्त्वाच्या विकेट्सची उजळणी करूया.

विकेट

सामना

बळी

तारीख

स्थान

स्वरूप

1

1

स्टीव्ह स्मिथ

जानेवारी 2016

सिडनी

ओडीआय

50

32

मोईन अली

जानेवारी 2017

कोलकाता

ओडीआय

100

64

एब डे विलियर्स

जानेवारी 2018

केपटाऊन

कसोटी

150

86

शिमरॉन हेतमेयर

नोव्हेंबर 2018

कोलकाता

टी20आय

200

109

दिमुथ करूणारत्ने

जुलै 2019

लीड्स

ओडीआय

250

135

जो रूट

फेब्रुवारी 2021

चेन्नई

कसोटी

300

156

निरोशन डिकवेला

मार्च 2022

बंगळुरू

कसोटी

350

181

मिशेल मार्श

नोव्हेंबर 2023

अहमदाबाद

ओडीआय

400

196

हसन महमूद

सप्टेंबर 2024

चेन्नई

कसोटी