आमच्या हृदयात कायम #BatchOf2024!
कोणालाही गुडबाय करणे कायम कठीण असते. विशेषतः एकमेकांशी आयुष्यभराचे नाते असलेल्या टॅलेंटेड खेळाडूंना गुडबाय करणे त्याहूनही कठीण!
आमची #BatchOf2024 अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या- वाईट परिस्थितीत उभी राहिली. आम्ही आमच्या काही स्टार्सना बाय करतो आहोत. मुंबई इंडियन्सच्या कुटुंबासाठी त्यांनी जे काही केले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.
ईशान किशन आणि टिम डेव्हिड या दोघांनी तोड फोड सुपरहिट्सची मेजवानी आम्हाला दिली. पलटनने तर त्यांच्या शॉट्सना, कसला भारी रे भावा! असंच म्हटलेलं आहे.
रोमारिओ शेफर्डने दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध विजय मिळवून देताना शेवटच्या ओव्हरमध्ये ३२ धावा कुटल्या आणि आमच्या वानखेडेवर तर आतषबाजीच झाली. आम्ही हे कधीच विसरणार नाही!
डेवाल्ड ब्रेविसने सामन्यात आक्रमक खेळ केला. आम्ही त्याची आठवण तर काढूच पण तिलक भाऊसोबतचा त्याचा क्यूट ब्रोमान्स कसा विसरता येईल बरं?
अर्थात, यातले काहीजण ऑक्शनदरम्यान एमआय फॅमिलीत परतू शकतात. आमच्याकडे आरटीएमदेखील आहे. त्याचा वापर आम्ही अनकॅप्ड खेळाडूसाठी करू शकतो. पण बॅच ऑफ २०२४ आणि २०२२-२४ मधला हा खेळ असाच नसणार आहे. #OneFamily च्या आठवणी कायमच लक्षात राहतील!
आयपीएल २०२५ मेगा ऑक्शनसाठी मुक्त केलेले खेळाडू
कॅप्ड |
अनकॅप्ड |
डेवाल्ड ब्रेविस |
हार्विक देसाई |
दिलशान मधुशंका |
आकाश मधवाल |
गेराल्ड कोत्झी |
अंशुल कंबोज |
ईशान किशन |
अर्जुन तेंडुलकर |
जेसन बेहरेन्डॉर्फ |
कुमार कार्तिकेय |
क्वेना मफाका |
नमन धीर |
ल्यूक वूड |
नेहल वढेरा |
मोहम्मद नबी |
पियूष चावला |
नुवान थुसरा |
शम्स मुलाणी |
रोमारिओ शेफर्ड |
श्रेयस गोपाळ |
टिम डेव्हिड |
शिवालिक शर्मा |
|
विष्णू विनोद |