
रोहित आणि एमआयच्या जोडीचा १२ वा वर्धापनदिन
चांगल्या खेळणाऱ्या तरूणापासून ते स्टार खेळाडूपर्यंत, एक कर्णधार आणि मग हिटमॅनच्या अवतारापर्यंत आणि एक मोठा लीडर होईपर्यंत चा हा १२ वर्षांचा प्रवास एका युगासारखा होता. रोहित शर्मा मोठा झालाय, मुंबई इंडियन्स मोठी झालीय आणि आपण, पलटनसुद्धा त्यांच्यासोबत मोठे झालोय.
८ जानेवारी २०११ रोजी लीग सुरू झाल्यापासूनच्या बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या मोठ्या लिलावात १२.१८ ते १२.२४ या वेळेत एक मोठं नाट्य घडलं. रोहितचं नाव समोर आलं आणि पंजाब, डेक्कन चार्जर्स आणि एमआय यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू झालं. आम्ही त्यात थांबण्याची शक्यता नव्हतीच. आम्हाला आमच्या खेळाडूला घरी आणायचंच होतं. शेवटी ३० लाख यूएसडीला तो आपल्याकडे आला.
आकडेवारीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास त्याने आपल्यासाठी खालील गोष्टी केल्या आहेत:
* पाच आयपीएल चषक, दोन चॅम्पियन्स लीग टी२० चषक. त्याच्या जवळपासदेखील कुणी फिरू शकणार नाही.
* २०१५ च्या आयपीएल अंतिम फेरीत अप्रतिम खेळून त्याने ५० (२६ चेंडू) केल्या आणि एमआयसाठी २००+ ची जबरदस्त धावसंख्या उभारून दिली.
* एमआयसाठीचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू. ४९८२ धावा (आयपीएल + सीएल टी२०)
* एमआयसाठी सर्वाधिक कॅप्स असलेला खेळाडू.
* फलंदाजीचे विक्रमः सर्वाधिक धावा, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक ५०+ धावा, सर्वाधिक सामनावीर पुरस्कार- एमआयचे सर्व विक्रम.
* कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विजय (१४३ सामन्यांमध्ये ८१ विजय)
२०१३ मध्ये विजयी घोडदौड सुरू झाली आणि आम्ही त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. एकामागून एक चषक जिंकत राहिलो. हे रोहितचे १३ वे वर्ष आहे. ही संख्या खूप खास आहे. आता या वर्षात येत असताना काहीतरी खास घडणार आहे अशी आम्हाला आशा आहे.
कमॉन रोहित, आता #6 वा चषक आणायची वेळ झालीय. पण त्यापूर्वी अभिनंदन आणि १२ वर्षांसाठी तुझे खूप आभार.