News

एचपी, रो, बूम, स्काय, टीव्ही- मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२५ साठी रिटेन केलेले पाच खेळाडू!

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्स आपल्या प्रमुख खेळाडूंना म्हणजे जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांना आपल्याकडे राखण्याची घोषणा करत असून आगामी आयपीएल २०२५ सीझनमध्ये हार्दिक टीमचे नेतृत्व करणार आहे. हे खेळाडू आपल्या अद्वितीय कामगिरी आणि वचनबद्धतेसाठी ओळखले जातात आणि ते मुंबई इंडियन्सच्या यशाचे शिलेदार आहेत. ते टीममध्ये एक नवीन फोकस, ऊर्जा आणि शक्ती आणण्यासाठी सज्ज आहेत. 

मुंबई इंडियन्सचे श्री. आकाश अंबानी म्हणाले की: "आम्ही कायम या गोष्टीवर विश्वास ठेवलाय की कुटुंबाची शक्ती तिच्या केंद्रस्थानी असते. हा विश्वास अलीकडेच झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नव्याने सिद्ध झाला आहे. जसप्रीत, सूर्या, हार्दिक, रोहित आणि तिलक हे एमआयचा वारसा पुढे सुरू ठेवतील. या खेळाडूंना आपल्या टीमशी आणि आपल्या ब्रँडशी जोडले गेले आहे. मागील महिन्यात एमआयचा कोअर ग्रुप आणि आपले प्रशिक्षक यांनी एकत्र येऊन प्रचंड मेहनत केली आहे. त्यांनी एमआयच्या विजयाचे स्वप्न पाहिले आहे. हे एकत्रित प्रयत्न आमच्या कोअर ग्रुप, आमचे चाहते आणि इतर भागधारकांमध्ये एक उत्तम विश्वास निर्माण करण्याप्रति एमआयच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. आमच्याकडून प्रत्येकाला अपेक्षित असलेला क्रिकेटचा पॅशनेट ब्रँड खेळत राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. ”

जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा हे मुंबई इंडियन्सने अनेकदा आयपीएल जिंकली तेव्हा संघाचे प्रमुख शिलेदार होते. त्यांनी लीगमध्ये टीमच्या वर्चस्वासाठी सातत्याने योगदान दिले. या महान खेळाडूंच्या यादीत नाव आहे तिलक वर्माचे. तो आयपीएलमध्ये सर्वांत तरूण टॅलेंट्सपैकी एक आहे. त्याने नवीन ऊर्जा आणि कौशल्य या मैदानात आणले आहे. यातल्या प्रत्येक खेळाडूने सामने जिंकणारे परफॉर्मन्सेस दिले आहेत. त्यामुळे आम्ही विजयी तर झालो आहोतच पण त्यांच्या प्रवासात प्रत्येक सीझनमध्ये पाठीराखे ठरणाऱ्या चाहत्यांसोबत एक उत्तम नाते तयार झाले आहे. 

रोहित शर्मा २०११ पासून मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे, जसप्रीत बुमरा २०१३ पासून, सूर्यकुमार यादव नऊ वर्षांपासून खेळत होता. हार्दिक पांड्या आठ सामन्यांमध्ये खेळला आहे तर तिलक वर्मा २०२२ पासून खेळतो आहे. त्यांचा टीमसोबतचा एक मजबूत इतिहास त्यांच्या वचनबद्धतेचे तसेच एमआयच्या मूल्यांबाबत त्यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. टीमचा केंद्रबिंदू म्हणून ते एमआयच्या शक्ती आणि ऊर्जेचे स्त्रोत आहेत. या सर्वांचे ध्येय टीमला विजयी करून देण्याचे आहे.