आयपीएल २०२५ रिटेंशन - तुम्हाला हे माहीत असायला हवं
पलटन, बहुप्रतीक्षित घोषणेचा आठवडा आलाय आणि आम्हाला माहितीय की तुमच्या उत्साहाला उधाण आलंय.
आयपीएल २०२५ चे नियम आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न प्रकाशित झालेले आहेत. तरीही तुमच्या मनात अजूनही काही शंका आहेत याची आम्हाला कल्पना आहे. पण चिंता करू नका, आम्ही आहोत ना!
इंडियन प्रीमियर लीग २०२५ रिटेंशन नियमांबद्दल जाणून घ्या.
1. फ्रँचायझीला रिटेंशनच्या टप्प्यात किंवा मेगा ऑक्शनदरम्यान राइट टू मॅच (आरटीएम) कार्डचा वापर करून जास्तीत जास्त सहा खेळाडू सोबत ठेवता येतात.
यातले कमाल पाच खेळाडू कॅप्ड खेळाडू असू शकतात आणि दोन खेळाडू अनकॅप्ड असू शकतात.
खेळाडू |
किंमत (रूपयांमध्ये) |
कॅप्ड खेळाडू 1 |
18 कोटी |
कॅप्ड खेळाडू 2 |
14 कोटी |
कॅप्ड खेळाडू 3 |
11 कोटी |
कॅप्ड खेळाडू 4 |
18 कोटी |
कॅप्ड खेळाडू 5 |
14 कोटी |
प्रत्येक अनकॅप्ड खेळाडू |
4 कोटी |
2. एखाद्या फ्रँचायझीने त्यांच्या राखलेल्या मूल्यापेक्षा जास्त किंवा कमी रक्कम दिल्यास काय होईल?
समजा एखाद्या परिस्थितीत कॅप्ड खेळाडू 2 ला त्याच्या टीमकडून त्याला राखण्यासाठी 17 कोटी रूपये दिले गेले. या परिस्थितीत फ्रँचायझीच्या पर्समधून 17 कोटी रूपये खर्च होतील. ही रक्कम त्याच्यासाठी राखून दिलेल्या किमतीपेक्षा 3 कोटींनी जास्त असेल.
त्याचवेळी एखाद्या फ्रँचायझीला कॅप्ड खेळाडू 2 ला 12 कोटी रूपये या त्याच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा कमी रकमेत खेळवायचे ठरवले तर- त्यांच्या लिलावाच्या पर्समधून १४ कोटी रूपये वजा होतील.
3. खालील दोन उदाहरणं राखण्यात आलेल्या खेळाडूंच्या संख्येचे १२० कोटी रूपयांच्या पर्समधून वजावटीच्या संदर्भातील वर्गीकरण आहेत.
- परिस्थिती 1: राखता येणाऱ्या खेळाडूंचा जास्तीत जास्त कोटा म्हणजे सहा खेळाडू ठेवायचे ठरल्यास आणि तो मेगा ऑक्शनपूर्वी पूर्ण झाला तर
कॅप्ड खेळाडू |
अनकॅप्ड खेळाडू |
किमतीचे वर्गीकरण |
शिल्लक रक्कम (रूपयांमध्ये) |
5 |
1 |
18 + 14 + 11 + 18 + 14 + 4 (= 79 कोटी) |
41 कोटी |
4 |
2 |
18 + 14 + 11 + 18 + 4 + 4 (= 69 कोटी) |
51 कोटी |
-
परिस्थिती 2: सहापेक्षा कमी खेळाडू रिटेन केले गेले आणि फ्रँचायझीने मेगा ऑक्शनदरम्यान आरटीएम कार्डचा वापर करायचा ठरवल्यास.
कॅप्ड खेळाडू |
अनकॅप्ड खेळाडू |
आरटीएम |
किमतीची वजावट |
शिल्लक रक्कम (रूपयांमध्ये) |
5 |
0 |
1 |
18 + 14 + 11 + 18 + 14 (= 75 कोटी) |
45 कोटी |
4 |
1 |
1 |
18 + 14 + 11 + 18 + 4 |
55 कोटी |
4 |
0 |
2 |
18 + 14 + 11 + 18 (= 61 कोटी) |
59 कोटी |
3 |
2 |
1 |
18 + 14 + 11 + 4 + 4 |
69 कोटी |
3 |
1 |
2 |
18 + 14 + 11 + 4 (= 47 कोटी) |
73 कोटी |
3 |
0 |
3 |
18 + 14 + 11 |
77 कोटी |
2 |
2 |
2 |
18 + 14 + 4 + 4 (= 40 कोटी) |
80 कोटी |
2 |
1 |
3 |
18 + 14 + 4 |
84 कोटी |
2 |
0 |
4 |
18 + 14 (= 32 कोटी) |
88 कोटी |
1 |
2 |
3 |
18 + 4 + 4 |
94 कोटी |
1 |
1 |
4 |
18 + 4 |
98 कोटी |
1 |
0 |
5 |
18 कोटी |
102 कोटी |
0 |
2 |
4 |
4 + 4 (= 8 कोटी) |
112 कोटी |
0 |
1 |
5 |
4 कोटी |
116 कोटी |
0 |
0 |
6 |
0 कोटी |
120 कोटी |
रिटेन करता येणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. फ्रँचायझी रिटेन करण्यात येणाऱ्या परदेशी खेळाडूंचाच पर्याय निवडू शकतात. याशिवाय, पर्सची वजावट अशा परिस्थितीत जशी आहे तशीच राहील.
5. ‘अनकॅप्ड खेळाडू’ श्रेणीत कोणाचा समावेश होतो?
आपल्या राष्ट्रीय संघासाठी प्रथम सामना खेळणार असलेला कोणताही क्रिकेटपटू, मग त्याचे स्वरूप कोणतेही असो. तो अनकॅप्ड खेळाडू ठरतो.
याशिवाय भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्या, एखाद्या खेळाडूने मागच्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या ११ च्या संघात खेळलेला नसल्यास (टी२०आय, कसोटी, ओडीआय) किंवा त्याचे बीसीसीआयसोबत सेंट्रल काँट्रॅक्ट नसल्यास त्याला अनकॅप्ड म्हटले जाईल.
चला तर मग, घोषणेसाठी तयार आहात पलटन?
खाली कमेंट्समध्ये तुम्ही किती उत्साही आहात हे सांगा!