News

T20WC 2024 फायनल| SAvIND: मेन इन ब्लू इतिहास, दुभंगलेली स्वप्ने आणि जखमी मनांवर फुंकर घालण्यासाठी सज्ज

By Mumbai Indians

आयसीसी टी२० विश्वचषक अंतिम सामन्यासाठी आपण तयार आहोत. शनिवार २९ जून रोजी बार्बाडोसमध्ये भारतासाठी दुसरा टी२० विश्वचषक मुकुट किंवा दक्षिण आफ्रिकेला पहिला चषक मिळणार याची उत्सुकता आहे.

भारताचा आयसीसी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील अनुभव आणि महत्त्वाचे विक्रम पार करण्यातील त्यांचा हातखंडा यांच्यामुळे त्यांना एक मोठा मानसिक फायदा मिळाला आहे. मेन इन ब्लूचे मागील अपयश मागे टाकून टी२० विश्वचषक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे वाढलेले मनोबल महत्त्वाचे आहे.

त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ एका चमत्कारापेक्षा कमी नाही. प्रोटीआजनीदेखील या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही. त्यांनी अगदी अटीतटीच्या सामन्यांमध्येही आपला खेळ उत्तमरित्या करण्याची क्षमता दखवली आहे. भारतासोबतच्या सामन्यांत त्यांची अनपेक्षितरित्या उसळी मारण्याची क्षमता एक सरप्राइज घटक ठरली आहे. त्यामुळे या चॅम्पियनशिप सामन्यात तग धरून राहण्यासाठी आणि विजयासाठी एक प्रॉमिसिंग लढा पाहायला मिळेल.

आकडेवारीच्या दृष्टीकोनातून भारताकडे माप झुकते आहे- २६ सामन्यांमध्ये १४ विजय. पण खेळपट्टीवर तुमचा खेळच महत्त्वाचा आहे आणि हा सामना आपल्यासाठी नेमके काय घेऊन येतो हे पाहायला आम्ही उत्सुक आहोत.

काय : दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत

कधी: शनिवार, २९ जून २०२४, रात्री ८ वाजता

कुठे: केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस

काय अपेक्षा आहे: टी२० क्रिकेटचे दिमाखदार सेलिब्रेशन. भारतीय प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा शेवटचा सामना. रोहित शर्मा- विराट कोहली स्पेशल. बुमरा आणि अर्शदीप प्रोटीआजच्या धोक्याला दूर करताना पाहाल. जगभरातील अब्जावधी भारतीय चाहते टीव्हीला डोळे लावून असतील आणि दुसऱ्यांदा भारताला टी२० वर्ल्ड कप ट्रॉफी उचलताना पाहतील.

दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारतः आकडेवारी

टी२०आयमध्ये एकास एक आकडेवारी

भारत

संघ

दक्षिण आफ्रिका

26

सामने

26

14

विजयी

11

11

पराभव

14

0

बरोबरीत

0

0

अनिर्णित

0

 

संघ

सर्वाधिक धावा

सर्वाधिक विकेट्स

भारत

रोहित शर्मा – ४२० धावा

भुवनेश्वर कुमार – १४ विकेट्स

दक्षिण आफ्रिका

डेव्हिड मिलर- ४३१ धावा

लुंगी निडी – १० विकेट्स

संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅम्सन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका: एडेन मार्क्रम (कर्णधार), ओट्टनिएल बार्टमान, गेराल्ड कोत्झी, क्विंटन डे कॉक, जॉर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जेन्सन, हेन्रिच क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एन्रिच नोर्ट्जे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स