News

T20WC 2024 उपांत्य सामना| INDvENG: एडलेड २०२२ चा वचपा काढण्याची वेळ

By Mumbai Indians

गुरूवारी (२७ जून) गयानामध्ये इतिहास घडवण्यासाठी लढा, विश्वचषक जिंकण्यासाठीचा लढा आणि जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ आणि विद्यमान जगज्जेते यांच्यातील लढा.

भारत टी२० विश्वचषक २०२४ मध्ये आतापर्यंत एकदाही सामना न हरता अत्यंत वेगाने विजयी वारूवर स्वार आहे आणि एकास एक आकडेवारी अत्यंत निसटती (१२-११) अशी आहे. सध्याची भारतीय टीम हुशारीने परिपूर्ण आहे आणि तिने कायमच आयसीसी विश्वचषकासाठी एक मोठे आव्हान समोर उभे केले आहे. या सामन्यासाठी आपल्या मनात धाकधूक आहोत कारण आपल्याला १३ वर्षांचा विश्वचषक ट्रॉफीचा दुष्काळ संपवायचा आहे आणि चाहते तर प्रचंड उत्साहात आहेत.

त्याचवेळी इंग्लंडची मोहीम यंदा हॉट अँड कोल्ड प्रकारची होती. त्यांनी चांगला खेळ करून विजय मिळवला आणि त्याचवेळी अनपेक्षित पराभवालाही सामोरे गेले. त्यांनी उपांत्य फेरीमध्ये पात्र ठरण्यासाठी कठीण संघर्षही केला आहे. विद्यमान चॅम्पियन्स सर्वतोपरी प्रयत्न करून एकामागून एक टी२० विश्वचषक जिंकणारी पहिली पुरूषांची टीम ठरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

क्रिकेटमधल्या महान खेळाडूंमधील फलंदाजी आणि गोलंदाजीमधली आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. एडलेड २०२२ चा स्कोअर सेटल करायची वेळ आली आहे. अंतिम सामन्यात जाण्याची ही संधी आहे. डोके शांत आणि स्थिर ठेवून खेळायचे आहे. आता या गोष्टीवरही विश्वास ठेवायचा आहे की टी२० वर्ल्ड कप ट्रॉफी तिच्या पहिल्या घरी परतणार आहे.

काय: भारत विरूद्ध इंग्लंड

कधी: गुरूवार दिनांक २७ जून रात्री ८ वाजता

कुठे: प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना.

काय अपेक्षा आहे: भारत विरूद्ध इंग्लंडचा रोमांचक सामना. बुमरा जो बटलर आणि कंपनीचे स्टंप्स उडवणार, पाऊस पडण्याची शक्यता आणि राखीव दिवस नाही. त्यामुळे सुपर ८ ग्रुपमध्ये भारताचे स्थान पहिले असल्यामुळे अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची शक्यता.

भारत विरूद्ध इंग्लंड: आकडेवारी

टी२०आयमध्ये एकास एक आकडेवारी

भारत

संघ

इंग्लंड

23

सामने

23

12

विजय

11

11

पराभव

12

0

बरोबरीत

0

0

अनिर्णित

0

 

संघ

सर्वाधिक धावा

सर्वाधिक विकेट्स

भारत

विराट कोहली - 639 धावा

युजवेंद्र चहल - 16 विकेट्स

इंग्लंड

जो बटलर - 475 धावा

ख्रिस जॉर्डन - 21 विकेट्स

संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅम्सन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज

इंग्लंड: जो बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियम लिव्हिंग्स्टन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, मार्क वूड