News

टी२० विश्वचषकातील सर्वोत्तम भारत विरूद्ध इंग्लंड सामने

By Mumbai Indians

आता मेन इन ब्लूसाठी जगातील पहिल्या क्रमांकाची टीम विरूद्ध गतविजेते असा सामना होणार आहे. टी२० वर्ल्ड कप २०२४ उपांत्य फेरीशिवाय याचा निर्णय घेण्यासाठी दुसरे कोणतेही स्टेज असू शकत नाही. 

टी२०मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामधील शत्रुत्व कायमच कट्टर राहिले आहे. परंतु एडलेडच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत आणि आयसीसी विश्वचषकाची इच्छा अजूनही ज्वलंत आहे. त्यामुळे रोहित शर्मा व कंपनी इंग्लंडचा प्रवास रोखण्यासाठी सज्ज आहेत.

या स्पर्धेत प्रचंड रोमांच आहे. त्यामुळे या मोठ्या सामन्यासाठी आपण तयार होत असताना आयसीसी मेन्स टी२० वर्ल्डकपमधील भारत व इंग्लंडदरम्यानच्या शत्रुत्वाचा समृद्ध इतिहास पाहूया. या दोन्ही संघांमधील सामना क्रिकेट चाहत्यांसाठी कायमच उत्सुकता वाढवणारा ठरला आहे.

२००७: रेड हॉट युवराजचा इंग्लंडवर हल्ला

असं म्हणतात की पहिलाय प्रभाव हा कायमच टिकणारा असतो. त्यामुळे भारत विरूद्ध इंग्लंड हा टी२०आयमधला पहिला सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अनेक पिढ्यांसाठी अविस्मरणीय आहे. युवराज सिंगची १६ चेंडूंमधली नाबाद ५८ धावांची इनिंग, ज्यात एकाच ओव्हरमध्ये सलग सहा षटकार मारण्याचा ऐतिहासिक विक्रमही समाविष्ट आहे. ही इनिंग कधीच विसरता येणार नाही. त्याच्या या खेळामुळे भारतीय संघाला २१८/४ चा पल्ला गाठता आला आणि इरफान पठाणच्या ३/३७ व आरपी सिंगच्या २/२८ या कामगिरीमुळे इंग्लंडला विजयापासून १८ धावा दूर ठेवण्यात यश आले.

२००९: लॉर्ड्सवरचे दुःख

विश्वचषक मिळाल्याच्या दोन वर्षांनंतर भारताला अवघ्या तीन धावांच्या पराभवामुळे चषक गमवावा लागला. हरभजन सिंगच्या ३/३० मुळे एमएस धोनीच्या टीमला इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये १५३/७ वर रोखता आले. पण भारतीय संघ १४ ओव्हर्समध्ये ८६/५ वर आला. परंतु युसुफ पठाणच्या १७ चेंडूंमध्ये नाबाद ३३ आणि धोनीच्या २० चेंडूंमध्ये नाबाद ३० धावांच्या बळावर भारताला डेथ ओव्हर्समध्ये संधी निर्माण झाली. दुर्दैवाने १९ व्या ओव्हरमध्ये स्टुअर्ड ब्रॉडने फक्त ९ धावा दिल्या. त्यामुळे आपल्याला १५०/५ वर इनिंग संपवावी लागली.

२०१२: कोलंबोमध्ये रो-भज्जी स्पेशल

इंग्लंडचा पराभव तर ठीकच होता. पण गतविजेत्यांविरूद्ध आणि तेव्हाच्या टी२०आय मधल्या पहिल्या क्रमांकाच्या टीमला हरवणे ही एक खास गोष्ट होती. भारताच्या दृष्टीकोनातून हा विजय रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांच्या खेळामुळे तसेच विद्यमान एमआय स्टार पियूष चावलाच्या कामगिरीमुळे आणखी गोड झाला. हिटमॅनच्या नाबाद ५५ धावांनी भारतासाठी पहिल्या इनिंगमध्ये १७०/५ धावा करणे शक्य झाले. या धावसंख्येचा बचाव करताना भज्जीने इंग्लंडच्या फलंदाजीचा धुव्वा उडवत ४/१२ अशी कामगिरी केली आणि भारताला ९० धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. पीसीनेही या सामन्यात २/१२ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याने चार ओव्हर्समधली एक ओव्हर शून्य धावा देणारी टाकली. त्यामुळे टीमला चांगले यश मिळाले.

२०२२: विजयापासून दोन पावले दूर

इतिहासात चौथ्या वेळी उपांत्य फेरीत पोहोचलेल्या आणि सुपर १२ मध्ये ग्रुप २ च्या पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाचा आत्मविश्वास इंग्लंडविरूद्ध प्रचंड वाढला होता. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केल्यानंतर विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर (४० चेंडूंमध्ये ५० धावा) हार्दिक पांड्याच्या ३३ चेंडूंमधील ६३ धावांमुळे १६८/६ पर्यंत पल्ला गाठता आला. दुर्दैवाने, तो आपला दिवसच नव्हता कारण एलेक्स हेल्स (८६) आणि जो बटलर (८०) जे कधी एमआय कुटुंबाचा भाग होते त्यांनी हातात दहा विकेट्स ठेवून इंग्लंडसाठी १६९ धावा केल्या.

आकडेवारी

टी२०आयमध्ये एकास एक आकडेवारी

संघ

सामने

विजय

पराभव

बरोबरीत

विजय %

भारत

२३

१२

११

-

५२%

इंग्लंड

२३

११

१२

-

४८%

 

संघ

सर्वाधिक धावा

सर्वाधिक विकेट्स

भारत

विराट कोहली – ६३९ धावा

युजवेंद्र चहल – १६ विकेट्स

इंग्लंड

जो बटलर- ४७५ धावा

ख्रिस जॉर्डन- २१ विकेट्स

टी२० विश्वचषकात INDvENG आकडेवारी

टी२० विश्वचषकात एकास एक आकडेवारी

संघ

सामने

विजय

पराभव

बरोबरीत

विजय %

भारत

-

५०%

इंग्लंड

-

५०%

 

संघ

सर्वाधिक धावा

सर्वाधिक विकेट्स

भारत

गौतम गंभीर – १२९ धावा

हरभजन सिंग – ८ विकेट्स

इंग्लंड

जो बटलर- ९१ धावा

ख्रिस जॉर्डन- ३ विकेट्स

थोडक्यात

* टी२०आयमध्ये इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा सूर्यकुमार यादव ११७ (५५) ने केल्या आहेत.

* इंग्लंडविरूद्ध टी२०आयमध्ये शतक नोंदवणाऱ्या खेळाडूंची सर्वाधिक संख्या भारताची आहे: ३ – रोहित शर्मा, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव.