News

INDvNZ, पहिली कसोटी: पराभव झाला परंतु सर्व बाद ४६ सामन्यात एक क्लासिक खेळ पाहायला मिळाला!

By Mumbai Indians

पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया धडाधड कोसलळ्यानंतर हा सामना पाचव्या दिवसापर्यंत खेळवला जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण त्यांच्या हार न मानण्याच्या स्वभावामुळे ते शेवटपर्यंत टिकून राहिले.

या संपूर्ण सामन्यात पेंडुलम सारखा हलत राहिला. मग तो न्यूझीलंडच्या दिशेने फिरला. त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या या सुंदर खेळाचा एक चांगला शेवट पाहता आला.

या अविस्मरणीय सामन्याच्या काही अद्भुत क्षणांची उजळणी करूया...

दुर्मिळ पडझड

पहिला दिवस पावसामुळे पूर्णपणे धुतला गेला. परंतु चाहत्यांना समोर काय आहे याची उत्सुकता होती. त्यामुळे ते दुसऱ्या दिवसासाठी आतूर होते.

परंतु, आपल्या डोळ्यांसमोर जे काही घडले त्याचा स्वप्नातही विचार न केल्यामुळे त्यांचा उत्साह ओसरला.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय क्रिकेट टीमला फक्त ४६ धावांमध्ये गुंडाळण्यात आले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय उपखंडातली ही सर्वांत कमी धावसंख्या होती. आपले पाच खेळाडू शून्यावर बाद झाले.

भारतीय संघाची पडझड झाल्यामुळे किवीजना उत्साह

न्यूझीलंडची सुरूवात त्यांच्या भेदक जलदगती गोलंदाजांच्या नेतृत्वाखाली चांगली झाली. त्यांनी फलंदाजांना पहिल्या इनिंगमध्ये उत्तम आघाडी मिळवून दिली. टॉम लॅथम आणि देवॉन कॉन्वे यांनी सकारात्मक खेळ सुरू केला आणि प्रारंभीची ६७ धावांची भागीदारी केली.

अष्टपैलू रचिन रवींद्रयाने शतक फटकावले. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील आपल्या टीमने नियमित विकेट्सही घेतल्या. जडेजाच्या ३ विकेट्समुळे भारतीय संघाने आघाडी २०० पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न केला. 

परंतु त्यांचा माजी कर्णधार टिम साऊथीने रचिन रवींद्रच्या मदतीने भारतीय गोलंदाजांना लोळवले. त्याने आठव्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर पाहुणा संघ ४०२ वर बाद झाला. पण त्यांच्या हातात ३५६ धावांची दणदणीत आघाडी होती. 

कमबॅक बघायचाय का? या तुम्ही. दाखवू तुम्हाला!

तुम्ही ३५६ धावांनी पिछाडीवर आहात? पण टीम इंडिया यात हार मानणारच नाही!

रो- जैस्वाल यांच्या जोडीने प्रतिहल्ला करायच्या तयारीनेच मैदान गाठलं. पहिल्या इनिंगमध्ये झालेली पडझड सावरायची त्यांची तयारी होती. आमचा मुंबईचा राजा रोहित शर्माने स्थिर ५२ धावा केल्या. त्यात आठ चौकार एक षट्कारही होता.  

त्यानंतर विराट कोहली आणि सरफराज खान यांनी येऊन स्कोअरबोर्ड हलता ठेवला. या दोघांनी तिसऱ्या दिवशी चहानंतरच्या सत्रात चांगला खेळ करत महत्त्वाच्या पन्नास धावा नोंदवल्या. त्यामुळे दुसरा दिवस २३१/३ वर संपला आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव आला.

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये आपला ९००० धावांचा टप्पाही पार केला. हा टप्पा पार करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला.

मग आपल्या गल्लीत सरफराज आणि पंत आले!

चौथा दिवस सुरू झाला. कसोटी सामन्यासाठी एक उत्तम सेटिंगसह!

मधल्या फळीत पंत सरफराजसोबत खेळायला आला. आदल्या दिवशी विराट शेवटच्या चेंडूवर दुर्दैवीरित्या बाद झाला. पंतने एक क्षणही न दवडता किवीजची धुलाई सुरू केली.

सरफराज ७० धावांवर खेळत होता. या २६ वर्षीय खेळाडूने चेंडू अत्यंत सुंदरपणे सीमारेषापल्याड पाठवून आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. त्याने बाद होण्यापूर्वी १५० धावा केल्या आणि भारताला धोक्यातून बाहेर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दुसरीकडे पंतने आपला पाय एक्सेलेरेटरवरून काढलाच नाही. तो खेळत राहिला आणि त्याने ९९ धावा केल्या. आपले सगळे पठडीबाहेरचे शॉट्स त्याने मारले. एक १०७ मीटर उंचीचा दणदणीत षट्कारही ठोकला.

या १७७ धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघाला धावा पूर्ण करून आघाडी घेणे शक्य झाले. आमच्या सगळ्या जीटीए चाहत्यांसाठी त्यांनी मिशन पूर्ण केले! रिस्पेक्ट+, नाही का!?

चहाच्या ब्रेकनंतर लवकरच भारतीय संघ ४६२ धावांवर गुंडाळला गेला. त्यांच्याकडे फक्त १०६ धावांचा बचाव करण्याची संधी होती. त्यामुळे भारताला विजय मिळवून देण्यासाठी गोलंदाजांना मेहनत करावी लागणार हे स्पष्टच होते.

अरेरे, पण असं व्हायचं नव्हतं!

बुमराच्या पाचव्या दिवशी घेतलेल्या दोन विकेट्समुळे सध्या डब्ल्यूटीसी टेबल टॉपर्ससमोर आशेचा किरण निर्माण झाला. परंतु प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करणं हे फार कठीण काम होतं.

रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी जेवणापूर्वी खेळ आपल्या ताब्यात घेऊन तो संपवला. न्यूझीलंडने ३६ वर्षांनी भारताविरूद्ध एक कसोटी सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

थोडक्यात धावसंख्या: भारताचा ४६/१० (ऋषभ पंत २०, यशस्वी जैस्वाल १३; मॅट हेन्री ५/१५) आणि ४६२/१० (सरफराज खान १५०, ऋषभ पंत ९९; विल्यम ओरूके ३/९२) न्यूझीलंडकडून आठ विकेट्सनी पराभव ४०२/१० (रचिन रवींद्र १३४; रवींद्र जडेजा ३/७२, कुलदीप यादव ३/९९) आणि ११०/२ (विल यंग ४८*; जसप्रीत बुमरा २/२९).