News

शारदाश्रम विद्यामंदिरचा 4 धावांनी रोमहर्षक विजय

By Mumbai Indians

दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिरने मुंबईत सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स आंतरशालेय क्रिकेट सुपर नॉकआऊट स्पर्धेत कांदिवलीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्कूलला 4 धावांनी फरकाने पराभूत केले.

प्रथम फलंदाजी करताना, शारदाश्रमने 27.3 षटकांत 5 बाद 141 धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार राजवीरसिंह सुर्वे आणि यश बोरकरने प्रत्येकी 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कांदिवली संघाचे गोलंदाज, कृष्णा विंचू (1/21) आणि ओम प्रजापतीने (1/23) अचूक मारा केला तरी प्रतिस्पर्ध्यांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखू शकले नाही.

प्रत्युत्तरादाखल, कांदिवली स्कूलने चांगली चुरस दिली तरी त्यांचा डाव 28.4 षटकांत 137 धावांत आटोपला.त्यांच्याकडून प्रशांत शिवप्रसादने सर्वाधिक 24 धावा केल्या.परंतु शारदाश्रम कर्णधार सुर्वेने अचूक मारा करताना 16 धावांत 4 विकेट घेत संघाला 4 धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह त्यांनी बाद फेरीच्या दिशेने वाटचाल केली.

14 वर्षांखालील मुले

• अंजुमन इस्लाम अल्लाना इंग्लिश स्कूल सीएसटी वि. आर्य विद्या मंदिर जुहू

अंजुमन इस्लाम अल्लाना इंग्लिश स्कूल, सीएसटीने आर्य विद्या मंदिर, जुहूचा 40 धावांनी पराभव केला. आरव यादवने शानदार फलंदाजी करत महत्त्वपूर्ण 37 धावा केल्या. गोलंदाज अनुज सिंग (5/15) आणि आफी शेख (3/10) अचूक मारा करताना विजय सुकर केला.

• चेंबूर कर्नाटक हायस्कूल वि. पराग इंग्लिश स्कूल, भांडुप

चेंबूर कर्नाटक हायस्कूलने प्रतिस्पर्धी पराग इंग्लिश स्कूलला 29.1 षटकांत 88 धावांत रोखताना 89 धावांचे आव्हान 8.3 षटकांत पार केले. फलंदाज अंकित म्हात्रे (35) आणि विघ्नेश शिंदे (34) तर गोलंदाज नयन साळुंखे (4/11) त्यांच्या विजयात चमकले.

• तारापूर विद्यामंदिर, पालघर वि. आर्य विद्यामंदिर, वांद्रे

तारापूर विद्यामंदिर पालघरने अवघ्या 19 षटकांत 120 धावांचा पाठलाग करताना 9 विकेट राखून विजय मिळवला. स्मित मेहरच्या नाबाद 40 आणि आर्यन कुमारच्या संयमी 25 धावांच्या खेळीच्या जोरावर त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, देवांशने 29 धावा करूनही आर्य विद्यामंदिर, वांद्रे संघाचा डाव 32.1 षटकांत 119 धावांत आटोपला. निमिष देव (5/16) आणि स्वयम आघाव (3/26) यांनी अचूक मारा केला.

• शारदाश्रम विद्यामंदिर, दादर वि. सरदार वल्लभभाई पटेल, कांदिवली

शारदाश्रम विद्यामंदिरने सरदार वल्लभभाई पटेल, कांदिवली संघाचा 4 धावांनी पराभव केला. 141 धावांचा पाठलाग करताना, सरदार वल्लभभाई पटेल स्कूलचा डाव 137 धावांवर संपला. राजवीरसिंह सुर्वेची अष्टपैलू चमक (42 धावा आणि 4/16) त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

• जमनाबाई नरसी, जुहू वि. पोदार इंटरनॅशनल स्कूल

जमनाबाई नरसी जुहूने जियान काळेच्या शानदार 69 धावांच्या खेळीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाचे 159 धावांचे आव्हान 4 चेंडू राखून पार केले. तत्पूर्वी, पोदार इंटरनॅशनल संघाचा डाव 158 धावांत आटोपला, त्यात एकलव्य जोगेश्वरने 38 धावांचे योगदान दिले. युग मस्करा (3/22) आणि वीर सहानी (2/22) यांनी गोलंदाजीत छाप पाडली.

• आयईएस व्ही. एन. सुळे इंग्लिश स्कूल, दादर वि. सेंट ऑगस्टीन हायस्कूल, वसई

आयईएस व्हीएन सुळे स्कूलने 176 धावांचे लक्ष्य 34 षटकात एका विकेटच्या बदल्यात पार करताना 9 विकेट राखून विजय मिळवला. स्वर्ण काटकरने 86 आणि सिद्धार्थ भोसलेने 64 धावा फटकावताना सामना एकतर्फी केला. त्यापूर्वी, सेंट ऑगस्टीन संघाला 7 बाद 175 धावा करता आल्या. त्यात लॉसन सेरेजो (44) आणि अर्जुन भानुशालीचे (43) सर्वाधिक योगदान होते. व्हीएन सुळे स्कूलकडून वरद फडतरेने (3/37) अचूक मारा केला.

16 वर्षांखालील मुले

• अल बरकत मलिक मुहम्मद इस्लाम इंग्लिश स्कूकुर्ला वि. माटुंगा प्रीमियर स्कूल

अल बरकतने 157 धावांचा पाठलाग अवघ्या 21.4 षटकांत करताना 7 विकेट राखून विजय मिळवला. पृथ्वी भालेरावने 74 धावांची धमाकेदार खेळी खेळली, त्याला आकाश मांगडेच्या 42 धावांची साथ मिळाली. माटुंगा प्रीमियरने प्रथम फलंदाजी करताना 37.1 षटकात 156 धावा केल्या. धैर्यशील देशमुख (3/28) आणि वेदांत बनेने (2/19) प्रभावी गोलंदाजी केली.

14 वर्षांखालील मुले – संक्षिप्त धावा:

• अंजुमन इस्लाम अल्लाना इंग्लिश स्कूल सीएसटी - 40 (आरव यादव 37) विजयी वि. आर्य विद्यामंदिर जुहू (अनुज सिंग 5/15, आफी शेख 3/10).

• चेंबूर कर्नाटक हायस्कूल अँड कॉलेज - 8.3 षटकांत 89(अंकित म्हात्रे 35, विघ्नेश शिंदे 34) विजयी वि. पराग इंग्लिश स्कूल (भांडुप) 29.1 षटकांत सर्वबाद 88(विराट राय 29, हृदय ठक्कर 22; नयन साळुंखे 4/11, विराज पाटील 2/17, सम्यक तांबे 2/23).

• तारापूर विद्यामंदिर पालघर -19 षटकांत 1 बाद 120 (स्मित मेहेर नाबाद 40, आर्यन कुमार 25 प.े; इवान भोन 1/27) विजयी वि. आर्य विद्यामंदिर बांद्रा - 32.1 षटकांत सर्वबाद 119(स्वयं आघाव 3/26).

• शारदाश्रम विद्यामंदिर दादर - 27.3 षटकांत 141/5 (राजवीरसिंह सुर्वे 42, यश बोरकर 42; कृष्णा विंचू 1/21, ओम प्रजापती 1/23) विजयी वि. सरदार वल्लभभाई पटेल कांदिवली 28.4 षटकांत सर्वबाद 137 (राजवीरसिंह सुर्वे 4-16).

• जमनाबाई नरसी जुहू - 28.5 षटकांत 159/6 (जियान काळे 69; अथर्व कश्यप 3/37) विजयी वि. पोदार इंटरनॅशनल स्कूल 30.5 षटकांत सर्वबाद 158 (एकलव्य जोगेश्वर 38; युग मस्करा 3/22, वीर सहानी 2/22).

• आयईएस व्हीएन सुळे इंग्लिश स्कूल दादर - 34 षटकांत 176/1 (स्वर्ण काटकर 86, सिद्धार्थ भोसले 64; लॉसन सेरेजो 1/9.) विजयी वि. सेंट ऑगस्टिन्स हायस्कूल वसई - 40 षटकांत 175/7 (लॉसन सेरेजो 44, अर्जुन भानुशाली 43; फडतरे 3/37).

16 वर्षांखालील मुले – संक्षिप्त धावा:

अल बरकत मलिक मुहम्मद इस्लाम इंग्लिश स्कूल, कुर्ला - 21.4 षटकांत 157/3 (पृथ्वी भालेराव 74, आकाश मांगडे 42; आर्यन कुमार 1/36, शौर्य गायकवाड 1/37) विजयी वि. माटुंगा प्रीमियर स्कूल - 37.1 षटकांत सर्वबाद 156 (सद्धा 52; धैर्यशील देशमुख 3/28, वेदांत बने 2/19).