News

श्रीलंका विरूद्ध भारत टी२०आय: कॅप्टन स्काय आणि गुरू गौतम यांच्या युगाचा आरंभ

By Mumbai Indians

सूर्यकुमार यादव टी२०आय मध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून आपल्या करियरची नवीन सुरूवात करत असताना त्याच्यासाठी स्काय इज दि लिमिट आहे. आपण शांत बसूच शकत नाही. मेन इन ब्लू सध्या शनिवारी (२७ जुलै) रोजी सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२०आय मालिकेसाठी श्रीलंकेत पोहोचले आहेत. त्यापाठोपाठ ओडीआय सामने आहेत. पण आधी समोर जे आहे त्यावर लक्ष देऊया.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी२०आयला गुडबाय केल्यानंतर भारतीय क्रिकेटमधले एक युग संपले. स्काय आता या नवीन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे आणि तो त्याच्या सीनियर्सची जबाबदारी पुढे नेईल. त्याचवेळी गौतम गंभीर टी२०मधल्या वर्ल्ड चॅम्पियन्सचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे.

दरम्यान, श्रीलंका अलीकडेच झालेल्या टी२० विश्वचषकातील आपल्या खराब खेळात सुधारणा करण्यासाठी तयार आहे. चरित असलंका त्यांचे नेतृत्व करणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्सविरूद्ध उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित होईल अशी अपेक्षा आहे. परंतु, हे करणे तितकेच कठीण आहे जितके सोपे म्हणणे आहे. सध्या विजयी वारूवर स्वार असलेल्या भारतीय संघाला खाली खेचणे त्यांच्यासाठी खूप कठीण काम आहे.  

मागच्या काही वर्षांत अनेक महान श्रीलंकन खेळाडूंनी एमआयसाठी ब्लू अँड गोल्ड जर्सी परिधान केली आहे. नुवान थुसरा म्हणजेच आपला तरूण मलिंगा याच्या बोटाला दुखावत झालीय आणि तो मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे एमआयचा दुसरा खेळाडू दिलशान मधुशंका खेळणार आहे. हार्दिक पांड्या ती ऐतिहासिक शेवटची ओव्हर टाकल्यानंतर आणि आपल्याला बार्बाडोसमधील त्या अविस्मरणीय संध्याकाळी भावनांच्या कल्लोळात टाकल्यानंतर आपल्या लाडक्या प्रतिस्पर्ध्यांसमोर उभा राहिला आहे. 

काय: श्रीलंका विरूद्ध भारत टी२०आय मालिका 

कधी: शनिवार, २७ जुलै ते मंगळवार ३० जुलै २०२४

कुठे: पल्लकेले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, पल्लकेले 

काय अपेक्षा आहे: नवीन कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकासह एक भारतीय टीम जी घरच्या खेळपट्टीवर २०२६ मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी आपला मार्ग आखण्यासाठी सज्ज आहे. सूर्यकुमार यादव आणि टीमसाठी सर्वांत लहान स्वरूपात एक आकर्षक नवीन प्रवास कारण ते तीन सामन्यांच्या मालिकेत लंकन्सविरूद्ध जिंकण्याची सवय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

श्रीलंका विरूद्ध भारत: आकडेवारी

टी२०आयमध्ये एकास एक आकडेवारी

श्रीलंका

संघ

भारत

29

सामने

29

9

जिंकले

19

19

हरले

9

0

बरोबरीत

0

1

अनिर्णित

1

 

श्रीलंका

संघ

भारत

दासून शनाका - 430 धावा

सर्वाधिक धावा

रोहित शर्मा - 411 धावा

दुश्मंता चमीरा - 16 विकेट्स

सर्वाधिक विकेट्स

युजवेंद्र चहल - 23 विकेट्स

संघ

भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅम्सन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, रवी बिष्णोई

श्रीलंका: चरित असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविश्का फर्नांडो, दिनेश चांदीमल (विकेटकीपर), कुशल मेन्डिस (विकेट कीपर), कुशल परेरा (विकेट कीपर), वनिंदू हसरंगा, कामिंदू मेंडीस, दासून शनाका, चामिंडू विक्रमसिंगे, असिता फर्नांडो, बिनूरा फर्नांडो, मथीशा पथिराना, महीश ठीकसना, दिलशान मधुशंका, दुनिथ वेलालगे