News

कर्णधार सूर्यकुमार यादव! त्याच्या कर्णधारपदाची आकडेवारी पाहा

By Mumbai Indians

क्रिकेटमधील सूर्यकुमार अशोक यादवचे युग त्याच्या अचूक आणि दमदार फलंदाजीसाठी, त्याच्या मि. ३६० व्यक्तिमत्वासाठी आणि त्याच्या क्षेत्ररक्षणातील अद्भुत कामगिरीसाठी ओळखले जाते. परंतु आता स्कायच्या क्रॉनिकल्समध्ये आणखी एक नवीन धडा आला आहे- आपला सूर्या दादा, दि कॅप्टन.

प्रचंड मेहनत, निर्भय दृष्टीकोन आणि सामन्यात रोमांच आणणारी त्याच्या खेळातील सुधारणा यांच्याद्वारे सूर्याने आपले- “मुझे बहुत बडा क्रिकेट खेलना है” हे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग त्याचे बालपणीचे प्रशिक्षक अशोक अस्वलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आखला आहे.

सूर्यकुमार यादवचा कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील रेकॉर्ड (२० ओव्हर्स क्रिकेट)

स्वरूप

सामने

विजय

पराभव

अनिर्णित/ बरोबरीत

धावा

सरासरी

सर्वाधिक धावा

टी२० (स्मॅट)

16

10

6

0

467

38.9

94*

टी२०आय (भारत)

8

5

2

1

300

42.9

100

आयपीएल (एमआय)

1

1

0

0

43

43

43

नोंद: बरोबरीत/ अनिर्णित असलेला टी२०आय सामना हा दक्षिण आफ्रिका आणि भारतादरम्यानचा पहिला सोडून दिलेला टी२०आय सामना होता.

स्कायने कर्णधारपदाचा पहिला अनुभव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई क्रिकेट टीमसोबत २०१९ साली मिझोरमविरूद्ध घेतला. या सामन्यात कमी धावा केल्या गेल्या. पण तेव्हा २९ वर्षांच्या असलेल्या स्कायने मुंबईकडून १० विकेट्सने विजय नोंदवला जाईल याची काळजी घेतली. २०१९ आणि २०२१ या कालावधीत तो १६ वेळा मुंबईचा कर्णधार होता. त्याने या दरम्यान १० विजय आणि सहा पराभव पचवले. त्याची सर्वोत्तम फलंदाजीची कामगिरी? त्याने ५३ चेंडूंमध्ये नाबाद ९४ धावा (११ चौकार ४ षटकार) करून मुंबईला स्मॅट २०१९ मध्ये ४४/२ वरून १७४/३ वर आणले.

२०२३ मध्ये गेलेल्या अप्रतिम वर्षात त्याने ३१ सामन्यांमध्ये ४६.५६ च्या सरासरीने आणि १८७.४३ च्या स्ट्राइक रेटने ११६४ धावा केल्या. या पार्श्वभूमीवर आपला दादा सूर्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची कॅप घालायची संधी मिळाली. यापेक्षा आणखी अविस्मरणीय काय होते? या ३२ वर्षीय खेळाडूने ज्या सामन्याचे नेतृत्व केले तो ईएसए डे होता. या दिवशी म्हणजे रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी ३६ स्वयंसेवी संस्थांमधील १९००० लहान मुली आणि २०० स्पेशल मुले आपल्या लाडक्या एमआय स्टार्सना कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध खेळताना पाहण्यासाठी उपस्थित झाली होती.

त्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर २०२३ पर्यंत सूर्यकुमारने ११ इनिंग्समध्ये ४३३ धावा केल्या होत्या. त्यात १ शतक आणि ३ अर्धशतके होती. त्याला टी२०आयमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. त्याची ही पहिली असाइनमेंट सोपी नव्हती कारण भारताने ऑस्ट्रेलियाचे पाच सामन्यांच्या मालिकेसाठी यजमानपद स्वीकारले होते. निकाल? स्कायच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने ऑसीजचा ४-१ ने पराभव केला.

क्रिकेटच्या या बदलत्या जगात प्रत्येक कर्णधाराच्या नावावर शतक असले पाहिजे आणि सूर्याला डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तिसऱ्या टी२०आयमध्ये ही संधी मिळाली. त्याच्या ५६ चेंडूंमधील शतकामुळे पहिल्या इनिंगमध्ये २०० पेक्षा जास्त धावा केल्या गेल्या. कुलदीप यादवच्या (५/१७) नेतृत्वाखाली गोलंदाजांनी अत्यंत सहजपणे विजय नोंदवला.

टी२० फॉर्मॅटशिवाय स्कायला लाल बॉल क्रिकेटमध्येही टीमचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली (मुंबई २०१४/१५ रणजी ट्रॉफी). त्याच्या नेतृत्वाखाली सहा सामन्यांमध्ये एकच विजय मिळाला.

सूर्यकुमार यादवला श्रीलंकेतील आगामी टी२०आय मालिकेत भारतासाठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा त्याने वर्षानुवर्षे केलेल्या मेहनत, वचनबद्धता, विश्वास आणि कोणत्याही स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दाखवलेल्या तयारीचा परिणाम आहे. देविशा शेट्टी - स्कायची पत्नी - मधील - तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरील एका स्टोरीत म्हणाली, "ही तुझ्या स्वतःच्या इतिहासाची सुरुवात आहे".

आम्ही तयार आहोत. पलटन तयार आहे. तर, सूर्या जा आणि मैदान गाजव. आम्ही वाट बघतोय.