News

भारताचा नवीन टी२०आय कर्णधार, सूर्यकुमार यादव

By Mumbai Indians

आपला दादा सूर्या आपल्या भारतासाठी सर्वोत्तम कामगिरीमुळे हेडलाइन्समध्ये सतत राहिला आहे. त्याला दोन वेळा टी२०आय क्रिकेटर ऑफ दि इयर (२०२२,२०२३) ने गौरवण्यात आले आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने घेतलेला कॅच पुढील अनेक पिढ्या लक्षात ठेवतील आणि आता तो टी२०आयचा कर्णधार झाला आहे.

२०२२ मध्ये (११६४ धावा), २०२३ मध्ये (७३३ धावा) आणि २०२४ टी२० विश्वचषकात (१९९) धावा अशा अप्रतिम कामगिरीनंतर आता त्याला जून २०२४ मध्ये भारताने टी२० विश्वचषक विजय मिळवल्यानंतर कर्णधारपद बहाल करण्यात आले आहे. सूर्यकुमार यादवचा टी२०आय कर्णधार म्हणून असलेला प्रवास त्याची मेहनत आणि कटिबद्धता यांचे प्रतीक आहे.

सूर्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. परंतु त्याच्यासाठी टी२०आयमध्ये भारतासाठी कर्णधारपद भूषवणे ही नवीन गोष्ट नाहीये. त्याने पहिल्या असाइनमेंटमध्ये घरच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. ही मालिका भारतीय संघाने ४-१ ने जिंकली. त्याच्या एकूण रेकॉर्डमध्ये आठ सामन्यांपैकी पाच विजय, दोन पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.

त्याचा स्पर्धात्मक दृष्टीकोन, खेळण्याची पद्धत, मिळालेल्या संधीचे सोने करण्याची सवय आणि आधुनिक काळातील महान खेळाडू म्हणून असलेले स्थान विचारात घेता सूर्यकुमार यादव एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून भारताला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी सज्ज आहे. आपण आपल्या मि. ३६० ला त्याच्या या नवीन असाइनमेंटसाठी- पूर्णवेळ कर्णधारपदासाठी शुभेच्छा देऊया. तो आता श्रीलंकेविरूद्ध व्हाइट बॉल क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहे.

सूर्यकुमार यादवचे टी२०आयमध्ये कर्णधारपदाचे रेकॉर्ड

तारीख

प्रतिस्पर्धी

निकाल

२३ नोव्हेंबर २०२३

ऑस्ट्रेलिया

विजयी

२६ नोव्हेंबर २०२३

ऑस्ट्रेलिया

विजयी

२८ नोव्हेंबर २०२३

ऑस्ट्रेलिया

पराभव

१ डिसेंबर २०२३

ऑस्ट्रेलिया

विजयी

३ डिसेंबर २०२३

ऑस्ट्रेलिया

विजयी

१० डिसेंबर २०२३

दक्षिण आफ्रिका

अनिर्णित

१२ डिसेंबर २०२३

दक्षिण आफ्रिका

पराभव

१४ डिसेंबर २०२३

दक्षिण आफ्रिका

विजयी