आमचा पुढील सामना सध्या फॉर्ममधल्या टीमसोबत आहेः महेला जयवर्धने
मुख्य मार्गदर्शक महेला जयवर्धने यांनी ६ मेला पहिल्या स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आरआरविरूद्ध आमच्या मागील सामन्यात सीझनच्या पहिल्या विजयानंतर संघाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि विजयातील आमच्या प्रयत्नांमुळे प्रशिक्षकांना खूप आनंद झाला आहे.
“आम्ही आमची कौशल्ये योग्य प्रकारे वापरू शकलो आणि मागील सामना चांगल्या जिंकू शकलो हे पाहताना खूप आनंद झाला. आम्हाला विजय प्राप्त करता आला. आम्हाला या सीझनमध्ये आधीही या संधी मिळाल्या होत्या आणि आता गुण मिळताना पाहून खूप आनंद वाटतोय. आम्ही उत्तम एकाग्रता साध्य केली आहे. आम्ही आता पुढच्या सामन्याच्या प्रतीक्षेत आहोत. तो एका फॉर्ममधल्या टीमसोबत असल्यामुळे आमच्यासाठी कठीण असेल,” महेला म्हणाले.
उर्वरित पाच सामन्यांसाठी तुमचे ध्येय काय हे विचारल्यावर प्रशिक्षकांनी टीमला आणखी विजय मिळावेत अशी इच्छा व्यक्त केली.
“आम्हाला सामने जिंकायचे आहेत, एक समूह म्हणून खेळायचे आहे. परिस्थिती कठीण होती. आम्ही आमच्या कार्यपद्धतीमुळे समाधानी नव्हतो. परंतु सगळे एकत्र राहिले आणि त्यांनी खूप मेहनत केली. आम्ही एकमेकांशी बांधून राहिलो आणि आमच्या क्षमतांवर विश्वास ठेवला. त्यामुळे उर्वरित सीझनमध्येही हे साध्य करता येईल. आम्ही जास्तीत जास्त सामने जिंकू आणि क्रिकेटचा आनंद घेऊ या गोष्टी करण्याची गरज आहे,” महेला म्हणाले.
ऑफ स्पिनर हृतिक शौकीनने दाखवलेल्या धैर्याचेही आमच्या कोचनी कौतुक केले. त्याच्या चार चेंडूंवर जोस बटलरने चार चौकार ठोकले. परंतु नंतर त्याने त्याला बाद केले. शिवाय कुमार कार्तिकेय सिंगचा पहिल्याच प्रवेशातील परफॉर्मन्सही त्यांना खूप आवडला.
“हृतिकच्या चेंडूंवर धावा काढल्या गेल्या. परंतु त्याने दाखवलेले धैर्य खूप महत्त्वाचे आहे. कार्तिकेय खूप चांगला खेळाडू आहे हे आम्हाला माहीत होते आणि त्याने खूपच सुंदर कामगिरी केली आहे. ही मुले पुढे येत आहेत हे पाहणे खूप आनंदाचे आहे,” ते म्हणाले.
महेलाने ज्येष्ठ खेळाडूंच्या म्हणजे कर्णधार रोहित शर्मा आणि कायरन पोलार्ड यांच्या कठीण पॅचबद्दलही चर्चा केली आणि टीमला त्यांची एकत्रित सातत्यपूर्णता वाढवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.
“पोलार्डला आपल्याला खेळ संपवता आला नाही याबद्दल खूप वाईट वाटते आहे. अनेकदा अशी परिस्थइती निर्माण झाली जेव्हा एका व्यक्तीला विजय मिळवून देणे कठीण होते. मागील सामन्यात डेव्हिड आणि डॅन गेम संपवायला पुढे आले. तो पहिल्या तीन चार सामन्यांत खूप चांगला वाटत होता. परंतु त्याला मदत मिळाली नाही. सातत्यपूर्णता दिसत नाही. परंतु आम्हाला एक समूह म्हणून आमची कामगिरी सुधारणे गरजेचे आहे,” महेला म्हणाले.
“रो दीर्घकाळ फलंदाजीसाठी चांगला आहे. उर्वरित खेळाडू त्याच्याभोवती खेळतात. त्याला आपल्या प्रारंभाचे रूपांतर करता आले नाही याबद्दल निराश वाटते आहे. परंतु आम्हाला आमच्या गेमप्लॅन्सची अंमलबजावणी करता आली पाहिजे. तुमच्या अनेक खेळाडूंनी चांगले क्रिकेट खेळणेही गरजेचे आहे. आमच्या गोलंदाजांनाही मेहनत करणे गरजेचे आहे, म्हणजे त्यांच्या ओव्हर्स लांबणार नाहीत.”
त्याने प्रत्येक खेळाडूला विशिष्ट भूमिका देण्याबद्दल आणि त्यांना ती समजून घेण्यास मदत करण्यावरही भर दिला.
“ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. ब्रेव्हिससारख्या एखाद्या खेळाडूसाठी तो खेळत असलेली जबाबदारी आणि तो त्यावर कशी अंमलबजावणी करू शकतो, परंतु त्याने बॅटिंगच्या क्रमावर परिणाम होऊ नये. आम्हाला खेळाडूंना विविध भूमिकांमध्ये स्थिर करायचे आहे. आपल्यासाठी सर्वोत्तम काय आहे हे समजणे महत्त्वाचे आहे. हे विरोधकांवरही अवलंबून आहे. त्यामुळे आम्ही टीम बनवतो तेव्हा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात,” ते शेवटी म्हणाले.
महेला यांनी काही सकारात्मक बाबींवर तसेच आम्हाला करणे गरजेचे असलेल्या काही गोष्टींवर भर दिला आणि आता आमची टीम प्रथम स्थानावर असलेल्या टीमचा सामना कसा करते हे पाहणे रोमांचक ठरेल.
हा सामना कठीण असणार आहे, पलटन. आम्हाला विजयासाठी तुमच्या जोरदार चिअर्सची गरज आहे.