News

जयसूर्या, मलिंगा, थुसरा आणि मागच्या काही वर्षांतले एमआय- एसएल नाते

By Mumbai Indians

मित्र आणि शेजारी पण क्रिकेटच्या मैदानावर अत्यंत तगडे प्रतिस्पर्धी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत- श्रीलंकेदरम्यानच्या स्पर्धा अशा थोडक्यात सांगता येतील. या आशियाई बलाढ्य संघांनी आतापर्यंत सहा व्हाइट बॉल विश्वचषक आपसात खेळले आहेत. ते आता शनिवारी (२६ जुलै) सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२०आय आणि ओडीआय मालिकेसह या दुहेरी स्पर्धेत आणखी एक आकर्षक प्रकरण लिहिण्यासाठी सज्ज आहेत.

मुंबई इंडियन्ससोबत या समुद्रापल्याडच्या काही महान खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आपण या दोन देशांमधल्या आणखी एका स्पर्धेसाठी सज्ज होत असताना ब्लू अँड गोल्ड गणवेश परिधान केलेल्या या महान देशातील खेळाडूंकडे पाहूया. 

1. सनथ जयसूर्या

एमआयमधील वर्षेः २००८, २००९, २०१०.

सामने: ३०

धावा: ७६८

सर्वाधिक धावसंख्या: ११४*

स्ट्राइक रेट: १४४

विकेट्स: १३

धडाकेबाज, विध्वंसक, सामना जिंकून देणारा या तीन गोष्टी सनथ जयसूर्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पोर्टफोलिओमध्ये दिसतात. मुंबई इंडियन्सने २००८च्या आयपीएल लिलावात त्याला जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या १९९६ साली वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने आयपीएल २००८ मध्ये दणदणीत कामगिरी केली. त्याने १४ सामन्यांमध्ये ५१८ धावा करत ऑरेंज कॅप स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. त्याच्या चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या ४८ चेंडूंमधील ११४ धावा त्याच्या पॉवर हिटिंगच्या युगाची याद देणाऱ्या ठरल्या.  

**********

2. दिलहारा फर्नांडो

एमआयमधील वर्षे: २००८, २००९, २०१०, २०११

सामने: १०

विकेट्स: १७

सर्वोत्तम आकडेवारी: ४/१८

दिलहारा फर्नांडो हा श्रीलंकेच्या सर्वोच्च स्थानावरील जलदगती गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावावर विविध स्वरूपांमधल्या ३०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. हा जलदगती गोलंदाज २००७ टी२० विश्वचषकातल्या त्याच्या सुंदर कामगिरीनंतर एमआयकडे आला. इथे तो श्रीलंकेचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला.

फर्नांडोचे आयपीएलमधले पहिले वर्ष यशस्वी ठरले. त्याने पाच सामन्यांमध्ये १० विकेट्स घेतल्या. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध ४/१८ अशी कामगिरी केली आणि आपल्या प्रचंड वेगाने पहिल्या फळीचा धुव्वा उडवला. ही त्याची एमआय जर्सीतली सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती. २०१० मध्ये त्याने एमआयसाठी पाच सामने खेळले आणि सात विकेट्स घेतल्या.

**********

3. लसिथ मलिंगा

एमआयमधील वर्षे: २००८-२०१७, २०१९-२०२०

सामने: १३९

विकेट्स: १९५

सर्वोत्तम आकडेवारी: ५/१३

आयपीएल फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या असताना प्रतिस्पर्धी संघाला बॉलने अडवण्यासाठी तुम्ही कोणावर विश्वास ठेवाल? अर्थात, लसिथ मलिंगा. या जलदगती गोलंदाजाने अत्यंत कठीण परिस्थितीत उत्तम कामगिरी करून पलटनला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. 

५४६ आंतरराष्ट्रीय विकेट्स, १९५ विकेट्स (आयपीएल आणि सीएलटी२०), १०० टी२०आय विकेट्स घेणारा पहिला खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार चेंडूंमध्ये चार विकेट्स दोनदा घेणारा पहिला खेळाडू (२००७- ओडीआय, २०१९- टी२०आय) असलेला मलिंगा २००७ मधला टी२० विश्वचषक यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर मुंबई इंडियन्सकडे आला. २००८ (२००८-१८ आणि २०१९-२०) या दोन कालावधीत या यॉर्कर किंगने एमआयला चार आयपीएल जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आमच्या विद्मयान बोलिंग कोचचा शेवटचा सामना आयपीएल २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध होता. त्याने शेवटच्या चेंडूवरील विकेटसह नऊ धावांचा बचाव केला. त्याची ही कामगिरी अनेक पिढ्या विसरणार नाहीत.

**********

4. थिसरा परेरा

एमआयमधील वर्षे: २०१२

सामने: ३

धावा: ६

विकेट्स: १

एक अष्टपैलू गोलंदाज असलेल्या थिसरा परेराच्या नावावर २०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. तो खालच्या फळीमध्ये उत्तम फलंदाजीही करू शकतो. आम्ही परेराला २०११ विश्वचषकात दिमाखदार कामगिरीनंतर साइन केले. तिथे त्याने अंतिम सामन्यात भारताविरूद्ध नऊ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या.

**********

5. असेला गुणरत्ने

एमआयमधील वर्षे: २०१७

सामने: खेळला नाही

हा अष्टपैलू खेळाडू दक्षिण आफ्रिकेतील ओडीआय मालिकेत अप्रतिम कामगिरीनंतर मुंबी इंडियन्सकडे आला. त्याने ऑस्ट्रेलियात एक शतक आणि टी२० मालिका जिंकली. तिथे त्याने तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतके करून मालिकापटूचा पुरस्कार जिंकला.

दुर्दैवाने, गुणरत्ने सीझनच्या सुरूवातीला दुखापतग्रस्त झाला आणि त्याला आयपीएल २०१७ मधून बाहेर पडावे लागले.

**********

6. अकिला धनंजय

एमआयमधील वर्षे: २०१८

सामने: १

विकेट्स: 0

अकिला धनंजयने नेट बॉलिंगमध्ये आपल्या जादुई स्पिनने सर्वांन आश्चर्यचकित केले. त्यानंतर २०१२ टी२० विश्वचषकात त्याची निवड श्रीलंकेच्या संघात झाली. भारताविरूद्ध २०१७ मालिकेतील त्याची कामगिरी ज्यात दुसऱ्या ओडीआयमध्ये त्याने सहा विकेट्स घेतल्या, त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्ससोबत आयपीएल खेळण्याची संधी मिळाली.

धनंजय एमआयसाठी आयपीएल २०१८ मध्ये एका सामन्यात खेळला पण त्याला विकेट्स मिळाल्या नाहीत.

**********

7. दिलशान मधुशंका

एमआयमधील वर्षे: २०२४

सामने: ०

दिलशान मधुशंकाने आपल्या २०२३ ओडीआय विश्वचषकातील अद्भुत कामगिरीद्वारे क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडवली. हा डावखुरा जलदगती खेळाडू श्रीलंकेच्या सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. त्याने नऊ सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या. त्याने भारताविरूद्ध पाच विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे त्याच्या देशाला त्याचा खूप अभिमान वाटला.

या सामन्यातील त्याच्या कामगिरीची नोंद घेऊन मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल २०२४ खेळाडू लिलावात खरेदी केले. परंतु दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएल २०२४ मध्ये तो खेळू शकला नाही.

**********

8. नुवान थुसरा

एमआयमधील वर्षे: २०२४

सामने: ७

विकेट्स: ८

श्रीलंका आणि गोलंदाज यांचं काहीतरी वेगळंच नातं आहे. नुवान थुसरा हा लिस्टमधला नवीन खेळाडू आहे आणि तो खळबळ उडवतोय. त्याने २०२४ मध्ये आयपीएलचा पहिला सामना बांग्लादेशविरूद्ध ५/२० अशी कामगिरी केल्यानंतर खेळला. त्याने या सामन्यात एक हॅटट्रिकही केली आणि भविष्यासाठी आपली क्षमता व आशा सिद्ध केली.

एमआयमध्ये नुवान थुसरा पहिल्याच सीझनमध्ये आपला आदर्श लसिथ मलिंगाच्या हाताखाली तयार झाला. त्याने आयपीएलमधला पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरूद्ध खेळला पण पहिल्या दोन सामन्यांमध्ये विकेट्स मिळाल्या नाहीत. नंतर आपली कमाल दाखवत त्याने पुढच्या पाच सामन्यांमध्ये आठ विकेट्स घेतल्या. त्याने आयपीएल २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सर्वोत्तम ३/२८ अशी कामगिरी केली.