
सूर्यादादा- तुला आमच्याकडून 3000 वेळा प्रेम!
पलटन एक अत्यंत खास गोष्ट साजरी करण्यासाठी थोडा वेळ काढूया- आपल्या लाडक्या सूर्यकुमार यादवने एमआयसाठी तब्बल ३००० पेक्षा जास्त आयपीएल धावा केल्या आहेत. ब्लू अँड गोल्डमध्ये ही कामगिरी करणारा हा तिसराच क्रिकेटपटू ठरला आहे.
हा फक्त एक टप्पाच नाही तर त्याने मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या संघात आणलेली सर्वोत्तमता, सातत्यपूर्णता आणि सामना जिंकून देण्याची मनोवृत्ती आहे. 🤩
आपली फलंदाजी म्हणजे पूर्णपणे 360° पॅकेज असते!
सूर्या २०१८ मध्ये पुन्हा एकदा #OneFamily चा भाग झाला. तेव्हापासून तो गेमचेंजर ठरला आहे. इनिंग स्थिर करायची असो किंवा मधल्या ओव्हर्समध्ये वेग वाढवायचा असो किंवा डेथ ओव्हर्समध्ये धुमाकूळ घालायचा असो. हे सर्व सूर्यादादाच्या स्टाइलमध्ये केले जाते.
त्याचे 360° शॉट्स, त्याचे ते जादुई सुप्ला शॉट्स आणि निडर आक्रमकता. स्काय म्हणजे एंटरटेनमेंट आहे ना भावांनो! 💪
जोरदार कामगिरी करणारा खेळाडू!
तुम्हाला जीटीविरूद्ध तडाखेबाज नाबाद १०३ धावा आणि आरसीबीविरूद्ध नाबाद ८२ धावा आठवतात का?
We won’t get tired of saying: Surya, tula 🙏#OneFamily #MIvGT #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 @surya_14kumarpic.twitter.com/5l9FP6bbn3
— Mumbai Indians (@mipaltan) May 12, 2023
या दोन इनिंग्स हिमनगाचे फक्त एक टोक आहेत. त्याने पुन्हा पुन्हा भौतिकशास्त्राचे नियम बदलून धावा करणे किती सोपे असते हे दाखवून दिले आहे.
टीमला सर्वाधिक गरज असते तेव्हा तो नक्कीच येतो. आणि हो, अत्यंत कठीण परिस्थितीतही तो संघाचे मनोबल वाढवत असतो. 💙
…आता चालू सीझनमधला हाच सीन बघा ना!
आजचं good preparation 👉 उद्याची winning mentality 💯
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2025
SKY's message to the boys is clear after #CSKvMI 🗣💙 #MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL pic.twitter.com/vuKpKDYQX8
पुढील स्थानक: ४,०००!
आकाशाला मर्यादा नसतात आणि स्कायला तर ४००० धावा करण्यापासून कोण रोखू शकणार आहे का?
आपला मि. डिपेंडेबल थांबणार तर नाहीच आहे आणि आपणही बघणार आहोतच! 😎
**********
एमआयसाठी ३०००+ आयपीएल धावा
नाव |
इनिंग्स |
धावा |
रोहित शर्मा* |
२०९ |
५४५८ |
कायरन पोलार्ड |
१७१ |
३४१२ |
सूर्यकुमार यादव* |
९५ |
३०१५ |
*कार्यरत खेळाडू | आकडेवारी २४ मार्च २०२५ नुसार
**********
सूर्याची एमआयसाठी सीझननिहाय आकडेवारी
सीझन |
इनिंग्स |
धावा |
२०१२ |
१ |
० |
२०१८ |
१४ |
५१२ |
२०१९ |
१५ |
४२४ |
२०२० |
१५ |
४८० |
२०२१ |
१४ |
३१७ |
२०२२ |
८ |
३०३ |
२०२३ |
१६ |
६०५ |
२०२४ |
११ |
३४५ |
२०२५^ |
१ |
२९ |
एकूण |
९५ |
३०१५ |
^ चालू सीझन | आकडेवारी २४ मार्च २०२५ नुसार